गेवराईत दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने शाळेत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:41 AM2018-05-28T00:41:33+5:302018-05-28T00:41:33+5:30

Given the money for drinking alcohol, school theft | गेवराईत दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने शाळेत चोरी

गेवराईत दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने शाळेत चोरी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळेतील चोरीचा दोन दिवसांतच लागला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील बाकडे, खुर्च्या आदी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन दिवसात या चोरीचा छडा लावला. ही चोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
गेवराई शहरातील जि.प. शाळेच्या इमारतीचे पाठीमागील दार तोडून अज्ञात चोरट्यांनी आतील लोखंडी बाकडे, खुर्च्या आदी १५ हजाराचे साहित्य चोरून नेले होते. त्यानंतर चोरट्यांनी शाळेसमोरील फँब्रीकेशनचे दुकानातूनही अंदाजे १० हजारांचे किरकोळ साहित्य चोरले होते. या प्रकरणी शाळेतील सेवक संतोष पोपळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीदार याकामी लावले होते. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानुसार भारत मारोती पवार (रा. सिरसदेवी, ता. गेवराई), मनोज आश्रुबा सोळंके (रा. कोल्हेर रोड, गेवराई) आणि पावन भीमराव सोळंके (सेनगाव, जि. हिंगोली) या तीन चोरट्यांना २४ मे रोजी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघेही चोर एकमेकांचे नातेवाईक असून दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी चोरी केल्याचे तपासात समोर आले. कोल्हेर रोडवरील एका बाभळीच्या झुडपात लपविलेला चोरीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने पार पाडली.

चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, तिघांनाही न्यालायासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Given the money for drinking alcohol, school theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.