‘वैद्यनाथ’ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:41 AM2018-10-02T00:41:48+5:302018-10-02T00:42:24+5:30

शेतक-यांचा एकही पैसा बुडणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. तुम्ही आजपर्यंत मला खूप प्रेम दिले, आशीर्वाद दिले, संयम दाखवला. असाच विश्वास कायम ठेवा कारखान्याचे वैभव कमी होऊ देणार नाही, ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

The general meeting of 'Vaidyanath' | ‘वैद्यनाथ’ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

‘वैद्यनाथ’ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Next
ठळक मुद्देवार्षिक सभा : पंकजा मुंडे यांचे ऊस उत्पादक, सभासदांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : स्वत:च्या जमिनी विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे काम फक्त मुंडेच करू शकतात, मी मुंडे साहेबाची लेक आहे आहे. शेतक-यांचा एकही पैसा बुडणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. तुम्ही आजपर्यंत मला खूप प्रेम दिले, आशीर्वाद दिले, संयम दाखवला. असाच विश्वास कायम ठेवा कारखान्याचे वैभव कमी होऊ देणार नाही, ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा आ.पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना आ.पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर आलेल्या अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा केला आहे. एकट्या साखरेच्या पैशातून शेतकºयांच्या एफआरपीचे पैसे देणे अशक्य आहे. त्यासाठी डिस्टीलरी, इथेनॉल सारख्या संलग्न प्रकल्पाच्या उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे. आम्ही वैयक्तिक मालमत्ता गहाण ठेवून त्या कर्जातून शेतकºयांना एफ.आर.पी. वाटप करणार आहोत, असे सांगून आगामी काळात इथेनॉल प्रकल्प जादा क्षमतेने सुरू करण्यासाठी यंत्र सामुग्री बसविण्यात येणार असल्याने त्या उत्पादनातून येणाºया काळात उसबिल देण्यात कसलीच अडचण येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक दीक्षितुलू यांनी अहवाल वाचन केले. सभेचे संचालन ज्ञानोबा सुरवसे यांनी तर दिनकरराव मुंडे यांनी आभार मानले. यावेळी वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, विकासराव डुबे, दत्ताप्पा ईटके, रमेश कराड, प्रकाश जोशी, पंडितराव मुठाळ, जीवराज ढाकणे, सुखदेवराव मुंडे, जुगलकिशोर लोहिया, गौतम नागरगोजे, श्रीहरी मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, ज्ञानोबा मुंडे, भाऊसाहेब घोडके, पांडुरंगराव फड आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The general meeting of 'Vaidyanath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.