पाटोद्यात सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 08:36 PM2018-03-19T20:36:49+5:302018-03-19T20:36:49+5:30

सुकाणू समिती आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला. 

fasting Movement of the Sukanu Committee in Patoda | पाटोद्यात सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

पाटोद्यात सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

Next

पाटोदा (बीड ): सुकाणू समितीतर्फे  आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या आंदोलनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. 

राज्य सुकाणू समितीने आज राज्यभर " अन्नदात्यासाठी अन्नत्याग " आंदोलन पुकारले होते. तालुक्यात सुकाणू समितीचे राज्य सदस्य राजाभाऊ देशमुख यांनी शेतकऱ्यांना आंदोलनांत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सुमारे पाचशेपेक्षा अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी राज्यपातळीवरील प्रश्नाशिवाय स्थानिक मागण्याही करण्यात आल्या. तालुका दुष्काळी जाहीर करावा, रस्त्यात गेलेल्या जमिनींचा योग्य मोबदला द्यावा , पिक विमा तातडीने वाटप करावा,शेतातील  मोकाट कुत्रे, रानडुक्कर , हरणांचा बंदोबस्त करावा, धान्यखरेदीसाठी मंडळनिहाय केंद्र सुरू करावीत , खाजगी व्यापाऱ्यामार्फत खरेदीसाठी धान्याचे लिलाव सुरू करावेत ,  भाजीपाला विक्रसाठी नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या मांडण्यात आल्या. आंदोलनकांना पाठिंबा देत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील शासकीय हमाल संघटनेने केली.  आंदोलनात महादेव नागरगोजे, विष्णूपंत घोलप, चक्रपाणी जाधव , अँड बंडू तवार , नामदेव सानप , गुलाब कोल्हे , अरुण येवले , आबा पवार , बाबासाहेब अडागळे, भागवत नागरे , नारायण थोरवे आदींचा सहभाग होता.  

Web Title: fasting Movement of the Sukanu Committee in Patoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.