बील थकविल्याप्रकरणी माजलगावात शेतकऱ्यांचा कारखान्यावर जनावरांसह ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:34 PM2018-11-01T18:34:18+5:302018-11-01T18:38:20+5:30

तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गाळप हंगामातील बील शेतकऱ्याने चुकते केले नाही.

farmers thiyya agitation infront of Jai Mahesh sugar factory for pending amount | बील थकविल्याप्रकरणी माजलगावात शेतकऱ्यांचा कारखान्यावर जनावरांसह ठिय्या

बील थकविल्याप्रकरणी माजलगावात शेतकऱ्यांचा कारखान्यावर जनावरांसह ठिय्या

Next

माजलगांव (बीड ) : तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गाळप हंगामातील बील शेतकऱ्याने चुकते केले नाही. या बिलाच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केले.

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाचे बिल थकविले आहे. कारखान्याचा यावर्षीचा गाळप हंगाम बुधवारी सुरु झाला. मात्र, मागील वर्षीचे बील अदा केल्याशिवाय गाळपास सुरूवात होऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी गेटवरच जनावरांस ठिय्या आंदोलन केले.

Web Title: farmers thiyya agitation infront of Jai Mahesh sugar factory for pending amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.