उसाला वाढीव भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी राष्ट्रीय महामार्ग २२२ केला बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:12 PM2017-11-01T15:12:59+5:302017-11-01T15:14:15+5:30

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतक-यांनी कोयता बंद आंदोलन करत आज राष्ट्रीय महामार्गावर क्र. २२२ वर रस्ता रोको केला.

Farmers shutting down National Highway 222 to demand higher prices of sugarcane | उसाला वाढीव भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी राष्ट्रीय महामार्ग २२२ केला बंद 

उसाला वाढीव भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी राष्ट्रीय महामार्ग २२२ केला बंद 

googlenewsNext

माजलगाव (जि. बीड) - पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतक-यांनी कोयता बंद आंदोलन करत आज राष्ट्रीय महामार्गावर क्र. २२२ वर रस्ता रोको केला. परभणी फाटा दुपारी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी केले. 

मागील काही दिवसांपासून माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोयता बंद आंदोलन सुरु आहे. उसाला साडेतीन हजार रूपये भाव द्यावा अशी त्यांची मागणी आहे. यावरही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाला तरी उसाचा भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच मागील दोन ते तिन दिवसांपासून तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्याकडे जाणारी वाहने अडवुन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

आज आंदोलनाची व्यापकता वाढवत शेतकऱ्यांनी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील परभणी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन सुरु केले. शेतकऱ्यांनी वाहतूक अडवल्यामुळे तब्बल एक तास हा महामार्ग बंद होता. आंदोलनात संपूर्ण तालुक्यातील मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता. तसेच याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही उपस्थित होता.

Web Title: Farmers shutting down National Highway 222 to demand higher prices of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी