भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:30 AM2018-10-16T00:30:28+5:302018-10-16T00:32:25+5:30

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवानगडावरील दसरा मेळावा त्यांच्या निधनानंतर मागील वर्षांपासून खंडित झाल्यानंतर हा दसरा मेळावा संत भगवान बाबांच्या जन्मभूमी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे होत आहे. यंदाच्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे.

Dussehra rally keen on the birthplace of Lordbank | भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची उत्सुकता

भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची उत्सुकता

Next
ठळक मुद्देमेळाव्याची जय्यत तयारी : देश-विदेशातून येणार भाविक; भगवान बाबांची २५ फूट उंच मूर्ती; स्मारकाचे होणार लोकार्पण

अनिल गायकवाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवानगडावरील दसरा मेळावा त्यांच्या निधनानंतर मागील वर्षांपासून खंडित झाल्यानंतर हा दसरा मेळावा संत भगवान बाबांच्या जन्मभूमी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे होत आहे. यंदाच्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. बाबांच्या भव्य २५ फूट उंचीची मूर्ती व स्मारकाचे लोकार्पण या वेळी होणार असल्याने लाखो भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुरुवारी होणाºया या दसरा मेळाव्यात राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. स्मारकाचे लोकार्पण संत-महंत राजकीय नेते आदींच्या उपस्थितीत होणार असल्याने हा सोहळा भव्य ठरणार आहे.
एक महिन्यापासून मेळाव्याची तयारी सुरु असून सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हारसह कार्यकर्ते, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. संत भगवानबाबांनी गोरगरीब, ऊसतोड कामगार, वंचितांना शिक्षणाचा मार्ग दाखविला त्यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेत जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी राज्य,देश-विदेशातूनही बाबांचे भक्त येणार आहेत.
देशभरातील संत-महंतांना आमंत्रण !
संत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत होणाºया दसरा मेळाव्यासाठी संयोजकांच्या वतीने देशभरातील मान्यवर संत-महंत विद्ववानांना आमंत्रण दिले असून त्यांची उपस्थिती व दर्शन लाखो भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
दहा लाख भाविक येण्याचा अंदाज
यंदाच्या दसरा मेळाव्यात राज्यासह देशभरातील अंदाजे दहा लाख भाविक येण्याची शक्यता असून, त्यांच्या सुविधांसाठी पाणी,चहा,नाष्टा याची सोय करण्यात येणार असल्याचे सरपंच रामचंद्र सानप यांनी सांगितले.
भाविकांच्या सुविधांसाठी बाबांची भूमी सज्ज:गोल्हार
देश-विदेशातून संत भगवान बाबांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुविधासाठी भगवानबाबांची नगरी सज्ज झाली असून, गुरुवारी सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचा विश्वास विजय गोल्हार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Dussehra rally keen on the birthplace of Lordbank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.