दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:17 AM2018-10-17T00:17:35+5:302018-10-17T00:18:14+5:30

सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Dussehra rally is the combination of devotion and energy | दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

googlenewsNext
ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन : सावरगाव येथे होणाऱ्या मेळावा मैदानासह इतर व्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवान गडावरील दसरा मेळावा त्याच्या निधनानंतर गत वर्षापासून संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होत आहे. सावरगाव येथे कामाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून भगवानबाबांच्या भव्य २५ फूट उंचीची मूर्ती व स्मारकाचे लोकार्पण या मेळाव्यात होणार असल्याचे डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. जवळपास अडीच एकर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. ६४ बाय ६४ फूट गोलाकार आकाराचे बांधकाम केले आहे. यात जवळपास सव्वादोन लाख लिटर पाणी साठविले आहे. पाण्यावर बसून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. त्याप्रमाणे दसºयाला या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे सावरगावचे रुपच बदलत आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मंदीर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.
पत्रकारांशी बोलताना खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा म्हणजे उसतोड कामगार आणि समाजासाठी एक आकर्षण असे. या मेळाव्या मुंडेसाहेब काय बोलणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असे. समाज आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात विचार मंथन होत असे. साहेबांनंतर पंकजाताईनी हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या भाषणातून उर्जा घेऊन भाविक, ऊसतोड कामगार, शेतमजूर आपापल्या गावी परतत असे.त्यामुळे भक्ती आणि उर्जेचा मेळावा आहे, असे त्या म्हणाल्या.
पावसाअभावी भयानक असा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सरसकट शेतकºयांना शासनाकडून मदत कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मुंडे म्हणाल्या.
रेल्वेमार्गाच्या कामाने गती घेतली आहे. २०१९ पर्यंत काम कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न चालू आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: Dussehra rally is the combination of devotion and energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.