मोफत फराळ वाटपातून दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:05 AM2018-11-05T00:05:57+5:302018-11-05T00:06:42+5:30

येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती.

Diwali sweet for two thousand families allotted free lunch | मोफत फराळ वाटपातून दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड

मोफत फराळ वाटपातून दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड

Next
ठळक मुद्देवंचितांची दिवाळी : बीडमध्ये राजयोग फाऊंडेशन, रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनचा तीन वर्षांपासून उपक्रम, लाभार्थ्यांचे चेहरे फुलले

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप धूत, रोटरीचे डीजीएन हरिष मोटवाणी, सामाजिक कार्यकर्ते बंडू कदम, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बजाज, सचिव अभिजीत ठाकूर , राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धूत आदी उपस्थित होते.
यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आशीर्वचन दिले. त्यानंतर दोन हजार कुटुंबांच्या प्रतिनिधींना मोफत दिवाळी फराळ व अभ्यंगस्नानाचे साहित्य तसेच पणत्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम धूत म्हणाले, रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनने सुरु केलेल्या मोफत फराळ वाटप उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा होती. तीन वर्षांपासून राजयोग व रोटरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. दीनदुबळ्या, गरजू व गरिबांना फराळाचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आम्हा आयोजकांना वेगळाच आत्मानंद होतो. त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असतात. हा उपक्रम दरवर्षी राबविला जाणार असल्याचे धूत म्हणाले.
रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष सुरेंद्र बजाज म्हणाले, या उपक्रमासाठी राजयोग सारख्या सामाजिक संघटना आम्हाला पाठबळ देत आहेत. त्यामुळे या मोफत फराळ वाटपाचे स्वरूप वाढले आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणखी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. शुभम धूत यांच्या दातृत्वामुळे आमच्या क्लबमधील सदस्यांनी खंबीर साथ देत यावेळी दोन हजार कुटुंबीय तसेच वर्तमानपत्र क्षेत्रात रात्रपाळीत काम करणाºया कामगारांना फराळ वाटपाचा संकल्प सिद्धीस नेला. प्रास्ताविक सूर्यकांत महाजन, सूत्रसंचालन नितीन गोपन यांनी केले. अभिजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊनचे सदस्य व राजयोग फाउंडेशनच्या सदस्यांनी मागील दीड महिन्यापासून अथक परिश्रम घेतले.

Web Title: Diwali sweet for two thousand families allotted free lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.