पिकविमाच्या मागणीसाठी मनसेचे केज तहसीलवर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:34 PM2018-06-18T21:34:21+5:302018-06-18T21:34:21+5:30

for Demand of crop insurance MNS agitation on kaij Tehsil | पिकविमाच्या मागणीसाठी मनसेचे केज तहसीलवर निदर्शने

पिकविमाच्या मागणीसाठी मनसेचे केज तहसीलवर निदर्शने

Next

केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्‍यांना गतवर्षीचा खरीपाचा पिकविमा अद्याप मिळाला नाही. त्याची रक्कम तत्काळ द्यावी या प्रमुख मागणीसह बोंडअळीचे अनुदान व नाफेडने खरेदी केलेल्या पिकांची रक्कम तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मनसेच्या आज दुपारी वतीने निदर्शने करण्यात आली.

केज व धारुर तालुक्यातील अनेक शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यातच गतवर्षीचे बोंडअळीचे नुकसान अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. तसेच नाफेडने खरेदी केलेय पिकांची रक्कम त्वरित वितरीत करावी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तहसील कार्यालयासमोर आज दुपारी निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसिलदार अविनाश कांबळे यांना प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष कल्याण केदार, विदयार्थी सेनेचे सचिन सिंपले, अंबाजोगाई शेतकरी सेना तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत, विशाल राऊत,महेंद्र उजगरे,सुनील साखरे,अशोक साखरे आदींची उपस्थिती होती. 

 

Web Title: for Demand of crop insurance MNS agitation on kaij Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.