पाली जवळील अपघातात जखमी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:03 PM2019-07-03T17:03:58+5:302019-07-03T17:05:39+5:30

ऑटो आणि कारची समोरासमोर धडक झाली

Death of a woman injured during a nearby Pali accident | पाली जवळील अपघातात जखमी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पाली जवळील अपघातात जखमी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next

गेवराई (बीड ) : पाली जवळील कोळवादी फाटी येथे मंगळवारी (दि.२ ) कार व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पाच भाविक जखमी झाले होते. या अपघातातील जखमी असलेल्या चंद्रकला शिवाअप्पा कापसे ( रा.मेन रोड गेवराई) यांचा उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री  9. 30. वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

शहरातील मेन रोड येथील रहिवाशी शिवा अप्पा कापसे हे मंगळवारी सकाळी अमावस्या निमित्त कपिलधार येथे मन्मथ स्वामीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनाहुन परत येत असताना पाली जवळील कोळवाडी येथे दुपारी 2. 30.च्या सुमारास रिक्षाला समोरून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. 

यामध्ये शिवलिंग अप्पा कापसे वय 65,चंद्रकला शिवाअप्पा कापसे वय 60, कैलास सुभाष कापसे वय 33, रूपाली कैलास कापसे वय 32, सतीश साहेबराव राठोड वय 25, हे या अपघातात जखमी झाले होते. यामधील गंभीर जखमी चंद्रकला शिवाअप्पा कापसे  यांचे रात्री 9.30 वा उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी गेवराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Death of a woman injured during a nearby Pali accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.