साळेगावात दफनभूमीच्या वादात मृतदेहाची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:38 AM2019-03-13T00:38:45+5:302019-03-13T00:39:23+5:30

साळेगाव येथे जागेच्या वादातून मृतदेह ताटकळत ठेवण्याचा प्रकार समोर आला. शेवटी मंगळवारी सायंकाळी दफनविधी झाला.

The dead body waited for graveyard | साळेगावात दफनभूमीच्या वादात मृतदेहाची फरपट

साळेगावात दफनभूमीच्या वादात मृतदेहाची फरपट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : घराला लागलेल्या आगीत भाजलेला इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर करण्यात येणारा दफनविधी जागेच्या वादात खोळंबला होता. त्यामुळे मृतदेह जामा मशीदसमोर ठेवला होता. पुन्हा एकदा साळेगाव येथे जागेच्या वादातून मृतदेह ताटकळत ठेवण्याचा प्रकार समोर आला. शेवटी मंगळवारी सायंकाळी दफनविधी झाला.
केज तालुक्यातील साळेगाव येथील गफूर हसन तांबोळी (६५) हे १० मार्च रोजी घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजले होते. त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, ११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांचा दफनविधी करण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तांबोळी समाजाच्या कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यास शेजारील शेतकऱ्याने हरकत घेतली. त्यानंतर मृतदेह जामा मशीदसमोर ठेवण्यात आला. तांबोळी समाजातील युवकांनी जामा मशीद समोरील कब्रस्थानमध्ये दफनविधी करू द्या, अशी मागणी केली. मात्र मुस्लिम समाजाने ही मागणी फेटाळून लावली. परंपरेनुसार बाजारतळाचे शेजारी तांबोळी समाजाचे कब्रस्थान आहे. आता त्याठिकाणी लोकवस्ती झालेली आहे, असे म्हणत तांबोळी समाजाच्या कब्रस्थान शेजारील एका शेतकऱ्याने विरोध केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार सचीन देशपांडे, मंडळ अधिकारी दळवी, तलाठी इनामदार, पोनि सुनील बिर्ला, सपोनि श्यामकुमार डोंगरे, पोउपनि सुरेश माळी, परमेश्वर वखरे यांनी साळेगावात धाव घेतली. प्रशासनाकडून मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. केज-कळंब रस्त्यावरील शासकीय गायरान जमिनीतील सार्वजनिक स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.
काय आहे नेमका वाद ?
तांबोळी समाजाच्या परंपरेनुसार त्यांच्या कब्रस्थानमध्ये मयत गफूर तांबोळी यांचा दफन विधी करू द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. आम्ही ही मुस्लिम असून आमच्या नातेवाईकवरही जामा मशीदच्या परिसरातील कब्रस्थानमध्येच दफन करणार, अशी भूमिका घेतली आहे. तर जामा मशीदच्या कब्रस्थानमध्ये दफन करण्यास मुस्लिम समाजाने विरोध केला आहे. या जागेच्या वादात मयत गफूर तांबोळी यांचा दफनविधी रखडला होता.

Web Title: The dead body waited for graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.