मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:02 AM2019-01-30T01:02:17+5:302019-01-30T01:02:23+5:30

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ईट येथील सूत गिरणीच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन तसेच भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असलेल्या बीड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणा-या भुयारी गटार योजनेचा शुभारंभ आणि इतर काही विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा दौºयावर येत आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis on 6 February on the district tour | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ईट येथील सूत गिरणीच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन तसेच भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असलेल्या बीड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणा-या भुयारी गटार योजनेचा शुभारंभ आणि इतर काही विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा दौºयावर येत आहेत.
आ. जयदत्त क्षीरसागर यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री गजानन सूत गिरणीच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या उपस्थिमध्येच बीड नगर परिषदेच्या सभागृहाचे ‘कै.गोपीनाथराव मुंडे सभागृह’ असे नामकरण तसेच मल्टीपर्पज क्रीडांगणाचे ‘कै.श्रीमती केशरबाई क्रीडांगण’ असे नामकरण करण्यात येणार आहे. बीड नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, पाणीपुरवठा यजनेचे लोकार्पण, पालिकेच्याच निवारागृहाचे लोकार्पण व जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री या दौ-यात करणार आहेत.
यातील जिल्हा रुग्णालयाचा विषय सोडला तर बाकीचे सर्व कार्यक्रम व उद्घाटन आ. जयदत्त क्षीरसागरांशी संबंधित संस्थांचे आहेत.
दिवाळीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या होत असलेल्या बीड दौ-याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन नियोजनाला लागले आहे.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis on 6 February on the district tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.