बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:57 AM2017-10-31T01:57:05+5:302017-10-31T01:57:25+5:30

गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन २८ संचालकांवर गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed District Bank scam: 28 accused of former minister, MLAs including MLAs | बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे

बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे

Next

गेवराई (जि. बीड) : गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन २८ संचालकांवर गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन २८ संचालकांनी जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा बँकेस बनावट कागदपत्रे सादर करून, १४ कोटी रुपयांचे कर्जही मिळविले. बँकेने गहाणखत करून घेण्यासाठी कारखान्याकडे तगादा लावल्याने, निपाणी जवळका येथील १ हेक्टरचे गहाणखत २०१३मध्ये करून दिले होते. बँकेची थकबाकी असताना, ती जमीन मनोहर शिवाजी काकडे यांना
परस्पर विकून बँकेची फसवणूक केली.
जयभवानी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी मोलॅसीस व स्पिरिटचा साठा नजर तारण ठेवला होता. असे असतानासुद्धा त्याची परस्पर विक्री केली. साखर कारखान्याच्या मालकीची जमीन राष्टÑीय महामार्ग क्र. २११च्या चौपदरीकरणासाठी शासनाने संपादित केली होती. त्यापोटी ४ कोटी ६३ लाख ७५ हजार २६८ रुपयांचा मावेजा मिळाला होता. ही रक्कम कारखान्याच्या खात्यात न टाकता बँकेच्या इतर खात्यांत जमा करण्यात आली, तसेच जिल्हा बँकेने २००५पासून कारखान्याने मागणी केल्यानुसार वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज दिले होते, परंतु यापैकी एकाचाही ठोस पुरावा बँकेकडे देण्यात आला नाही. खतासाठी कर्ज घेतले व ते कुणाला वाटले, याची कारखान्याने माहिती दिली नाही.

३९ कोटींचा अपहार
या साखर कारखान्यासाठी मंजूर झालेले कर्ज १४ कोटी ५७ लाख व त्यावरील व्याज २४ कोटी ४३ लाख असे एकूण ३९ कोटी एवढ्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकृषी कर्ज व वसुली विभागाचे सहायक व्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
चेअरमन जयसिंह शिवाजीराव पंडित, व्हाइस चेअरमन पाटीलबा रंगनाथराव मस्के, माजी मंत्री शिवाजीराव अंकुशराव पंडित, राष्टÑवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरसिंह शिवाजीराव पंडित, दत्तात्रय यादवराव येवले, शिवाजीराव भीमराव वावरे, अनिरुद्ध सोपानराव लोंढे, श्रीराम विठ्ठलराव आरगडे, भागवतराव सखाराम वेताळ, अशोकराव कैलासराव थोपटे, बप्पासाहेब लक्ष्मणराव तळेकर, राजेसाहेब त्र्यंबकराव पवळ, शिवाजीराव उत्तमराव नावडे, शेख शब्बीर शेख मेहबूब पटेल, अप्पासाहेब शिवदास खरात, रमेशलाल मारोतराव जाजू, केशवराव भाऊसाहेब औटी, प्रेमचंद नारायण गायकवाड, विठ्ठलराव जाणुजी शेळके, पंडितराव जनार्दन खेत्रे, कुमारराव गोविंदराव ढाकणे, मदनराव रामराव घाडगे, शोभाबाई भगवानराव चव्हाण, महानंदाबाई वैजनाथराव चाळक, सुमनबाई विठ्ठलराव गोरडे, शेषेराव पांडुरंगराव सानप, एस.एन. जोशी, अशोक दिगांबर पानखडे.

Web Title: Beed District Bank scam: 28 accused of former minister, MLAs including MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.