रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:50 PM2018-09-19T23:50:24+5:302018-09-19T23:51:10+5:30

जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

Beed district administration slowed down the work due to vacant posts | रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली

रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली

googlenewsNext
ठळक मुद्देपदासोबतच अतिरिक्त जबाबदारी : रवींद्र परळीकर, प्रभोदय मुळे रुजू का होत नाहीत ?

प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात बदली होऊन रुजू होण्यासाठी आलेले निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांना रुजू करून घेतले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
संपूर्ण जिल्ह्याचा कणा असणाºया महसूल विभागातील रिक्त पदांमुळे अनेक महत्त्वाच्या कामांची गती मंदावली आहे. याचा नाहक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. तीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांच्यासह इतर कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे बीड व अंबाजोगाई दोन ठिकाणचा पदभार आहे. उपविभागीय अधिकारी गणेश निºहाळी यांच्याकडे एस.डी.ओ पाटोदा व समन्वय भूसंपादन बीड, महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी रोहियो व उपविभागीय अधिकारी बीड या पदांसह कांबळे यांच्याकडे इतर दोन विभागांचा देखील अतिरीक्त पदभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे विभागातील अनेक प्रकरणांच्या सुनावण्या प्रलंबित राहत आहेत. उपजिल्हाधिकारी (सामान्य) सुनील भुताळे यांच्याकडे भूसंपादनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त आहे, याचा परिणाम धान्य वितरण कामकाजावर होत आहे. ई-पॉस मशिनचा वापर कमी होऊन आॅनलाईन धान्य पुरवठा टक्का घसरला आहे.
पुरवठा विभागाला कोणी वाली राहिला नसल्याने तिथे मनमानी कारभार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आष्टीचे तहसीलदार हिरामन झिरवाळ यांच्याकडे अतिरिक्त शिरुर तहसीलचा भार, धारुरचे तहसीलदार सुनील पवार यांच्याकडे अतिरिक्त वडवणीचे तहसीलदार पद देण्यात आले आहे. एकाच अधिकारी, कर्मचाºयांकडे इतर अतिरिक्त पदाचा कार्यभार असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचाºयांना तणाव, चिडचिडेपणा व इतर आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवत असल्याचे काही अधिकाºयांसडून सांगण्यात आले.
महसूल प्रशासनासह कृषी, बांधकाम, जिल्हा परिषद, पाटबंधारे, महावितरण, गृहविभाग, समाज कल्याण व इतर शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत.
परळीकर, मुळे आले राहिले आणि गेले ...
४निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व बीड उपविभागीय अधिकारी विकास माने यांची बदली आॅगस्ट महिन्यात झाली होती, त्यानंतर विधिमंडळ व रोहियो समिती कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येणार असल्यामुळे या अधिकाºयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यमुक्त क रण्यात आले नव्हते. मात्र दौरा रद्द झाला व त्यानंतर विकास माने यांनी औसा येथे पदभार स्वीकारला. त्यामुळे त्यांचे पद रिक्त झाले. त्यानंतर बदली होऊन जिल्ह्यात आलेले व रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असणारे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे हे रुजू होण्यासाठी बीड येथे आले. काही दिवस शहरात राहिले परंतु, त्यांना पदावर रुजू न करून घेतल्यामुळे ते परत निघून गेल्याची माहिती सूत्रांनी देली. मात्र पदे रिक्त असताना देखील त्यांना रुजू का करून घेतले नाही, याविषयी विविध तर्क,वितर्क लावले जात आहे.

Web Title: Beed district administration slowed down the work due to vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.