बीडमध्ये हैद्राबादहून औरंगाबादकडे जाणारा चार क्विंटल गांजा पकडला; एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:44 PM2018-01-20T21:44:55+5:302018-01-20T21:45:25+5:30

हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली.

In Beed caught four quintals of ganja from Hyderabad to Aurangabad; Action of LCB | बीडमध्ये हैद्राबादहून औरंगाबादकडे जाणारा चार क्विंटल गांजा पकडला; एलसीबीची कारवाई

बीडमध्ये हैद्राबादहून औरंगाबादकडे जाणारा चार क्विंटल गांजा पकडला; एलसीबीची कारवाई

googlenewsNext

बीड : हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली. 

हैदराबादहून एका दहा टायरच्या ट्रकमधून (एपी १६ टीवाय १२०६) औरंगाबादकडे गांजा नेला जाणार असल्याची महिती हैदराबाद पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिली. अधीक्षक श्रीधर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना माहिती देत पथक मांजरसुंब्याकडे रवाना केले. ट्रक केजहून पुढे निघाल्याचे समजताच पाळवदे यांनी मांजरसुंबा येथेच सापळा लावला. रात्री आठ वाजता ट्रक येताच दबा धरून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी ट्रकला आपली जीप आडवी लावून ट्रक अडविला. तपासणी केली असता यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

रात्री उशिरापर्यंत ट्रकमधून गांजा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची नोंदही झाली नव्हती. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, परमेश्वर सानप, नरेंद्र बांगर, रवि गोले, सखाराम सारूक, रूपसिंग राठोड यांनी केली. दरम्यान या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली असून हा गांजा नेमका कोठे जाणार होता? याचा तपास घेतला जात असल्याचे पाळवदे म्हणाले.

गांजा रस्त्यात केला ‘पार्सल’
हैदराबादहून निघाल्यापासून हा गांजा अनेक ठिकाणी विक्री केल्याचा संशय आहे. कारवाईनंतर  पुढे बीड, औरंगाबादला गांजा देण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ट्रकमधील मुख्य साहित्य उस्मानाबादमध्ये उतरविल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दुसरी मोठी कारवाई
चार दिवसांपूर्वीच बीडमधील पेठबीड भागात ३६ पोती गुटखा पकडल्याची मोठी कारवाई बीड एलसीबीचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी केली होती. त्यानंतर गांजावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून या गांजाची ‘साखळी’ बीडमध्ये पोहचत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. संबंधिताचे नावही समोर आले असून त्याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: In Beed caught four quintals of ganja from Hyderabad to Aurangabad; Action of LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.