७ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:09 AM2019-02-22T00:09:07+5:302019-02-22T00:10:32+5:30

जतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात २२ फेब्रुवारी रोजी प्रभावी मोहीम राबविण्यात येणार असून श्हरी व ग्रामीण भागातील सुमारे ७ लाख ४४२ बालकांना जंतनाशक गोळ्यांची मात्रा दिली जाणार आहे.

7 lakh infant pancreatic pills | ७ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

७ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

Next
ठळक मुद्देजंतनाशक दिन मोहीम : २२ फेब्रुवारीला जिल्हाभरात अंमल, २७ रोजी मॉप अप दिन

बीड : राष्टÑीय जतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात २२ फेब्रुवारी रोजी प्रभावी मोहीम राबविण्यात येणार असून श्हरी व ग्रामीण भागातील सुमारे ७ लाख ४४२ बालकांना जंतनाशक गोळ्यांची मात्रा दिली जाणार आहे. या दिवशीच्या मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मॉप अप दिन निश्चित करण्यात आला आहे.
१ ते २ वर्ष तसेच २ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुले, मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर प्रशिक्षण दिले आहे.
दुसºया टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया शाळेचे नोडल शिक्षक तसेच आरोग्य कर्मचाºयांना नियमित कार्यक्रमातून प्रशिक्षण दिले आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुले- मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी राष्टÑीय जंतनाशक दिनाचे आयोजन केले जाते.

स्वच्छतेचा अभाव : कृमीदोषाचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कामुळेच
जागतिक आरोग्य संगटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटात जवळपास ६८ टक्के मुले असून २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाºया परजीवी जंतांपासून धोका आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव याचे प्रमुख कारण असून या कृमीदोषाचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहज होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष कमजोर करणारा आहे. मातीतून प्रसारित होणाºया कृमीदोषाचे प्रमाण २९ टक्के आहे. भारतात ५ वर्षाखालील मुल- मुलींमध्ये रक्तक्षयाचे ७० टक्के प्रमाण आढळते. एनएफएचएसच्या सर्वेक्षणानुसार राज्यात कुपोषणामुळे ५ वर्षाखालील ३४.४ बालकांची वाढ खुंटल्याचा अहवाल आहे. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये तर ३० टक्के किशोरयवीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. त्यामुळे भावी पिढी आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.

Web Title: 7 lakh infant pancreatic pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.