बीड जिल्ह्यात पासिंगअभावी ५४० ट्रक उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:08 AM2017-12-13T01:08:38+5:302017-12-13T01:08:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : केवळ पासिंग नसल्याने जिल्ह्यातील ५४० ट्रक जागेवरच उभे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

540 trucks stand in the bead district due to passing | बीड जिल्ह्यात पासिंगअभावी ५४० ट्रक उभे

बीड जिल्ह्यात पासिंगअभावी ५४० ट्रक उभे

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘एआरटीओ’ कार्यालयाचा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : केवळ पासिंग नसल्याने जिल्ह्यातील ५४० ट्रक जागेवरच उभे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ट्रक मालक, चालकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रक उभ्या असल्याने वाहनांसाठी कर्ज घेतलेल्या बँकेचे हप्ते भरणेही मुश्किल झाले असून आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे संघटनेने सांगितले. अधिका-यांच्या मनमानी कारभारविरोधात संघटना आक्रमक झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जवळपास दोन हजार ट्रक (दहा टायर व त्यापेक्षा जास्त) आहेत. या सर्व ट्रक मालवाहू असून मालकांनी बँकेचे कर्ज, फायनान्स करून घेतलेल्या आहेत. एका ट्रकचा किमान ५० हजार रूपये हप्ता महिन्याला भरावा लागतो. परंतु मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ५४० ट्रक पासींगअभावी जागेवरच उभे आहेत.

मालक, चालक कार्यालयात गेल्यावर आमच्याकडे वेळ नाही, ट्रॅक नाही, असे कारणे सांगून येथील ‘निकम्मे’ अधिकारी वेळ काढून नेत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे ट्रकमालक वैतागले आहेत. सोमवारी त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आरटीओ कार्यालयातील बेजबाबदार कारभार कशाप्रकारे चालतो, याचे वाभाडे काढले.
यावेळी त्यांनी निष्क्रीय अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर सडकून टिका केली.पत्रकार परिषदेला संघटनेचे सरचिटणीस फैय्याज खान, सय्यद मुस्तफा, गणेश नलावडे आदींसह इतरांची उपस्थिती होती.

  • कामे सोडून हप्ते घेण्यात व्यस्त

कार्यालयात गेल्यावर आम्हाला वेळ नाही, असे वेगवेगळे कारणे सांगितले जातात. परंतु गाड्या अडवून त्यांच्याकडून हप्ते घ्यायला अधिकाºयांना वेळ असतो, अशी टिका संघटनेचे फैय्याज खान यांनी केली. वेळ पडली तर या ‘निकम्म्या’ अधिकाºयांचे कारणामे पुराव्यांसहीत देऊ, असेही खान यांनी सांगितले.

  • १४ डिसेंबरला रास्ता रोको

वाहनांची नोंद न होणे, प्रमाणपत्र वेळेवर न मिळणे, अधिकाºयांकडून होणारी अडवणूक आदींमुळे मालक, चालक वैतागले आहेत.
या विरोधात १४ डिसेंबर रोजी संघटनेच्यावतीने बायपासवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचेही संघटनेचे सरचिटणी फैय्याज खान यांनी सांगितले.

Web Title: 540 trucks stand in the bead district due to passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.