बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:14 AM2019-03-01T00:14:24+5:302019-03-01T00:15:16+5:30

कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली.

322 crore budget for Beed Municipal Corporation | बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

Next
ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर यांची पत्र परिषद : २२ वर्षांपासून करवाढ न करणारी एकमेव नगर परिषद

बीड : कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली. नागरिकांना मुलभूत सुविधांसह बीड शहराची गणणा स्मार्ट सिटीमध्ये व्हावी यासाठी या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही करवाढ न करता भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील २२ वर्षापासून करवाढ न करणारी राज्यातील एकमेव नगरपालिका असल्याचे देखील क्षीरसागर म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले, योजना पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कार्यकाळ असतो, मात्र आपण या योजना फक्त दोन वर्षात पूर्ण करत आहोत. त्यामुळे बीड शहर हे स्वच्छ, सुंदर व सुविधायुक्त होणार आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या अमृत अटल योजना, भूयारी गटार योजनांचा शुभारंभ केलेला आहे. तसेच रस्त्यांचे देखील बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे.
अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर बीडकरांना मुबलक पाणी मिळणार असून पाणीचोरी पूर्णपणे थांबणार आहे. शहरात स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे व नवीन रस्त्यांचे बांधकाम, विद्युत पुरवठा व पाणीपुवठा सुरळीत करण्यात येणार आहे. तसेच उद्यान निर्मिती व सुशोभिकरण, काही ठिकाणी ओपन जीमसह इतर सुविधा देण्यासाठी देखील विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
बीड शहर स्वच्छता सर्वेक्षणात देशभरातून १०९ व्या क्रमांकावर आले आहे. अंबिकापूर मॉडल शहरात राबवणार असून, शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर शाश्वत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील डॉ.क्षीरसागर यावेळी म्हणाले. तसेच नगरपालिकेतील राजकीय पक्ष एमआयएम, शिवसेना व भाजप नगरसेवकांनी अर्थसंकल्पास पाठींबा दिल्याबद्दल यांनी त्यांचे अभार देखील मानले व मधल्या काळात विरोधी पक्षातील काही जणांकडून विकासकामांना खिळ घालण्याचे काम केले होते. तसेच नगर परिषदेचे काम करणाऱ्या कंत्राटदारासोबत ‘सेटलमेंट’ न झाल्यामुळे बदनामी देखील विरोधकांकडून करण्यात आली होती, असा आरोप डॉ. क्षीरसागर यांनी यावेळी केला. मात्र आता संख्याबळ आपल्या बाजूने असल्यामुळे विकासकामांना गती मिळणार असल्याचे देखील डॉ.क्षीरसागर यावेळी म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेत सभापती मुखीद लाला, नगरसेवक विनोद मुळूक, अ‍ॅड. विकास जोगदंड, गटनेते सय्यद सादेक अली, किशोर पिंगळे, मोहम्मद सादेक, किशोर काळे, भीमराव वाघचौरे आदी उपस्थित होते.

Web Title: 322 crore budget for Beed Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.