आष्टीत जुगार अड्ड्यावर छाप्यात ऑडी कारसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; १५ जुगारी ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:41 PM2019-05-14T18:41:44+5:302019-05-14T18:42:44+5:30

आष्टी शहरालगतच्या शिराळ शिवारातील शेतात सुरु होता जुगार

30 lakhs seized with Audi car; 15 gambling possession | आष्टीत जुगार अड्ड्यावर छाप्यात ऑडी कारसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; १५ जुगारी ताब्यात 

आष्टीत जुगार अड्ड्यावर छाप्यात ऑडी कारसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; १५ जुगारी ताब्यात 

Next

आष्टी (बीड ) : आष्टी शहरालगतच्या शिराळ शिवारातील शेतात  जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचे पथक सोमवारी आष्टीत दाखल झाले होते. यादरम्यान त्यांना शिराळ शिवारातील पंजाब कासम आजबे यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री ८ वाजता सदर शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता तिथे गोटिराम दत्तात्रय आजबे, कचरु दगडु आजबे, रमेश सुर्यभान धोतरे वय, संजय पोपट वाल्हेकर, बाळासाहेब अर्जुन राळेभात, मच्छिंद्र साहेबराव मसाळकर, विलास अशोक कर्डुले, राजेंद्र मारुती वंजारे, नासीरखन गुलाबखन, बापु कचरु थोरात, महावीर बबन भंडारी, विकास पंढरीनाथ जगताप, लहु राधाकिसन बहिर, पोपट भिमराव पोकळे आणि रावसाहेब गंगाराम जगताप हे १५ जण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख १ लाख १४ हजार २४० रुपये, एकूण ९४ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल, सात दुचाकी तसेच आॅडी, स्कॉर्पियो या चारचाकी वाहनासह एकूण २९ लाख ३८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो.ना. पांडुरंग देवकते यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे, पोलीस कर्मचारी गणेश नवले, रेवननाथ दुधाने, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, हनुमान राठोड आदींनी केली.

आठवड्यात चौथी मोठी कारवाई
विशेष पथकाची या आठवड्यातील ही चौथी मोठी कारवाई आहे. अंबाजोगाई शहर, परळी ग्रामीण, बीड शहर ठाणे हद्दीनंतर आता ही चौथी कारवाई आहे. या कारवायांमुळे अधीक्षकांनी ठाणे प्रमुखांची चांगलीच कानउघडणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 30 lakhs seized with Audi car; 15 gambling possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.