बीडमधून २७९ शिक्षक अखेर कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:22 AM2018-11-19T00:22:54+5:302018-11-19T00:23:42+5:30

येथील जिल्हा परिषदेंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले.

279 teachers from Beedam are finally free | बीडमधून २७९ शिक्षक अखेर कार्यमुक्त

बीडमधून २७९ शिक्षक अखेर कार्यमुक्त

Next
ठळक मुद्देजि.प. चा धाडसी निर्णय : आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बिंदू नामावलीनुसार ठरले अतिरिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा परिषदेंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. या प्रकरणी राजकीय दबाव वाढलेला असताना तो न जुमानता न्यायालयाचा निर्णय व शासन आदेशाचे पालन करीत जिल्हा परिषद प्रशसनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
२०१४ मध्ये बीड जि. प. मध्ये जवळपास आंतरजिल्हा बदलीने ८८६ प्राथमिक शिक्षक आले होते. बिंदूनामावली तपासून नियमाप्रमाणे या शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेतले होते. बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या सुमारे ४८३ सहशिक्षकांपैकी फक्त आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सेवा कनिष्ठ ३०२ शिक्षकांचीच यादी १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करुन हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतीनुसार दुरुस्ती करुन सुधारित यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उर्वरित अतिरिक्त १८१ शिक्षक हे वस्तीशाळा शिक्षक असल्यामुळे त्या- त्या प्रवर्गाच्या शून्य बिंदूवर किंवा मुळ शिक्षक अतिरिक्त असल्याने त्या प्रवर्गात अतिरिक्त स्वरुपात शिक्षण विभागाने ठेवले आहे.
आता तिकडे पेच होणार
बीड जिल्हा परिषदेतून या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे ३१ जिल्हा परिषदेमध्ये पदस्थापना देताना पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
जरी सदर जिल्हा परिषदेत संबंधित प्रवर्गात शिक्षक अतिरिक्त झाले तरी त्या शिक्षकांची मुळ अस्थापना त्या जिल्ह्यात आहे.
तसेच बीड जिल्हा परिषदेने ज्या पद्धतीने मुळ शिक्षकांना अतिरिक्त दर्जा देऊन ठेवले आहे, त्याच पद्धतीने त्या- त्या जिल्हा परिषदांनी न्यायालयाचा निर्णय व शासन आदेशाचे पालन करुन घेणे आवश्यक ठरले
आहे.
२२ शिक्षकांची दोन दिवसात सुनावणी
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व अतिरिक्त ठरलेल्या ३०२ शिक्षकांपैकी २२ शिक्षकांनी त्यांची नियुक्ती व आंतरजिल्हा बदली इतर प्रवर्गात असल्याबाबत कागदपत्रे सादर केली.
त्यामुळे त्यांच्या कार्यमुक्तीचा निर्णय २० नोव्हेंबर रोजी सुनावणीत मुळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर होणार आहे. एक शिक्षक मयत असल्याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे.
एका शिक्षकाचे बीड जिल्हा परिषदेमध्ये शासकीय आश्रमशाळेत चुकीचे समायोजन झाले आहे. त्यामुळे संबंधितास अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७८ शिक्षकांना विविध ३१ जिल्हा परिषदांमध्ये रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे.
रिक्त पदांचा अहवाल द्या
शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ११ तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक तेथे पर्यायी योजनेचा प्रस्ताव दोन दिवसात जिल्हा परिषदेकडे सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: 279 teachers from Beedam are finally free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.