गेवराईत रिक्षा-जीप अपघातात १६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:25 AM2017-11-30T00:25:15+5:302017-11-30T00:25:37+5:30

आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

16 passengers were injured in rickshaw-jeep crash | गेवराईत रिक्षा-जीप अपघातात १६ प्रवासी जखमी

गेवराईत रिक्षा-जीप अपघातात १६ प्रवासी जखमी

googlenewsNext

गेवराई : आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथील नागेश समगे हा रिक्षा (एमएच २३ एन १७०९) हा चालवत होता. गेवराई येथील आठवडी बाजारासाठी निघालेले प्रवासी या रिक्षामध्ये बसलेले होते. राष्ट्रीय महामार्गावरील पाईप कारखान्यासमोर बीड येथून औरंगाबादकडे जात असलेल्या जीपचा [एमएच २६ एल २३९२] ओव्हरटेक करताना रिक्षासोबत अपघात झाला. दोन्ही वाहनातील १६ प्रवाशी जखमी झाले असून ८ प्रवाशी गंभीर आहेत.

दरम्यान गंभीर प्रवाशांना येथील उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. ८ जणांवर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसून जीप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघातातील जखमी
जनाबाई औटी [६५, रा. साष्ट पिंपळगाव ता. अंबड], अण्णासाहेब गायकवाड [७५, किनगाव] कौशालाबाई गायकवाड [किनगाव], माया वाघमारे [५०, कोल्हेर], कचरु शिंदे, [७५, किनगाव], कस्तुराबाई चाळक [४५, किनगाव], हरीभाऊ गव्हाणे [५५, कोल्हेर], मिना वाघमारे, रमा गायकवाड, करण भोले, अनिता भोले, आशाबाई शिंदे, अनिता भोले, शिवराम भिसे [६५], नंदिनी गायकवाड [१२] यांचा जखमीमध्ये समावेश आहे.

Web Title: 16 passengers were injured in rickshaw-jeep crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.