हॅंडसम दिसण्यासाठी पुरुषांनी वापर या खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 11:41 AM2018-11-06T11:41:58+5:302018-11-06T11:44:07+5:30

सुंदर दिसणं हा केवळ महिलांचा हक्क नाहीये, तर पुरुषांचाही आहे.  त्यांनाही सुंदर दिसायचं असतं.

Have to look handsome so follow these Mens tips | हॅंडसम दिसण्यासाठी पुरुषांनी वापर या खास टिप्स!

हॅंडसम दिसण्यासाठी पुरुषांनी वापर या खास टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : Brand Equity)

सुंदर दिसणं हा केवळ महिलांचा हक्क नाहीये, तर पुरुषांचाही आहे.  त्यांनाही सुंदर दिसायचं असतं. अनेक पुरुष हे आपल्या सुंदरतेची फार काळजी घेताना दिसतात. पण काही असे पुरुष असतात जे याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. तर काहींना हॅंडसम तर दिसायचं असतं पण त्यांना हे माहीत नसतं की, स्वत:ची काळजी कशी घ्यायची. त्यामुळे अशांसाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

शेविंग, स्क्रब आणि फेसवॉश - हॅंडसम दिसण्यासाठी शेविंग करणं फारच गरजेचं असतं. पण आजकालचा ट्रेन्ड हा बिअर्ड लूकचा आहे. जर तुम्हाला बिअर्ड लूक हवा नसेल तर क्लीन शेव ठेवा. त्यानंतर चेहऱ्यावर स्क्रब केल्यास फायदो होतो. त्यानंतर चेहरा फेसवॉशने स्वच्छ करणे विसरु नका. याने तुमच्या चेहऱ्यावर लगेच ग्लो येईल आणि चेहरा मुलायमही होईल.  

टोन मॉश्चरायजर - चेहरा स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्याच्या त्वचेचं पीएच बॅलन्स कायम ठेवण्यासाठी एखादं टोनर लावा. या दिवसात पुरुषांसाठी टिंटेड मॉइश्चरायजर बेस्ट असतं, कारण याने चेहऱ्यावर नॅच्युल ग्लो येतो.

कॉम्पॅक्ट पावडर - अनेकदा पुरुषांचा चेहरा फार लवकर तेलकट होतो. त्यामुळे घराबाहेर जाताना त्वचेशी मिळता जुळता कॉम्पॅक्ट लावा. याने चेहरा तेलकट किंवा चिकट वाटत नाही. 

कंसीलर - तणाव आणि ओव्हरबर्डनमुळे कधी कधी डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होतात. यापासून बचाव करण्यासाठी कंसीलरचा वापर करावा. कंसीलर वापरल्यानंतर हलकं फाउंडेशन सुद्धा लावा. याने तुमचा चेहरा चमकदार होईल.

लिप बाम - हे केवळ मुलींसाठी नाही तर मुलांसाठीही गरजेचं आहे. ओठांची त्वचा फार नाजूक असते आणि त्यामुळे फाय लवकर डिहायड्रेट होते. थंडीच्या दिवसात ओठ मुलायम आणि शायनी करण्यासाठी लिप बामचा वापर करा.

Web Title: Have to look handsome so follow these Mens tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.