सतत कुठेही डोकं खाजवत असल्याने हैराण आहात ? करा हा सोपा घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:50 PM2018-12-27T12:50:56+5:302018-12-27T12:53:49+5:30

हिवाळा आला की, त्वचेसोबतच केसांची समस्याही डोकं वर काढते. डोकं खाजवणे ही समस्या तर या दिवसात सामान्य आहे.

Get rid of an itchy scalp with marigold flowers | सतत कुठेही डोकं खाजवत असल्याने हैराण आहात ? करा हा सोपा घरगुती उपाय!

सतत कुठेही डोकं खाजवत असल्याने हैराण आहात ? करा हा सोपा घरगुती उपाय!

हिवाळा आला की, त्वचेसोबतच केसांची समस्याही डोकं वर काढते. डोकं खाजवणे ही समस्या तर या दिवसात सामान्य आहे. डोक्याची त्वचा सतत खाजवत असल्याने चारचौघांमध्ये लाजिरवाण्या क्षणाचाही सामना करावा लागतो. इन्फेक्शनमुळे ही खाज येते. पण अशात करायचं काय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. 

डोक्याच्या त्वचेची खाज दूर करण्यासाठी हर्बल ऑइल फार चांगले पर्याय ठरु शकतात. अरोमा थेरपी एक्सपर्ट डेनिले रेमन याने त्याच्या  ‘द अरोमाथेरपी हॅंडबुक’ या पुस्तकात लिहिले आहे की, झेंडूच्या फूलाचा वापर करुन तुम्ही डोकं खाजवणं थांबवू शकता. चला जाणून घेऊ या फूलाचा वापर कसा करायचा.

कसा कराल वापर?

- ५०० एमएल पाण्यात चार झेंडूची फुले टाका आणि दोन मिनिटांसाठी हे पाणी उकळू द्या.

- या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिश्रित करा.

- शम्पू करण्याआधी किंवा आंघोळ करण्याआधी या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेची मसाज करा.

- त्यानंतर अॅपल विनेगर पाण्यात मिश्रित करा आणि हे पाणी उकळू द्या.

हे सर्व केल्यानंतर केसांना शॅम्पू करा आणि केस तसेच कोरडे होऊ द्या. हेअर ड्रायरचा वापर करु नका. याने डोक्याची त्वचा आणखी खाजवू शकते. झेंडूच्या फुलाच्या या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेची खाज आरामात दूर होऊ शकते. 
 

Web Title: Get rid of an itchy scalp with marigold flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.