लग्न ठरल्यावर वजन कमी करण्याचं टेन्शन वाढलंय? वापरा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:01 PM2018-11-26T12:01:35+5:302018-11-26T12:06:36+5:30

सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अशात ज्यांचं लग्न जुळलंय त्यांना वेगवेगळ्या कामांसोबतच वाढलेलं वजन कमी करण्याचही टेन्शन आलेलं असतं.

Brides trying to loose weight before their marriage follow these tips | लग्न ठरल्यावर वजन कमी करण्याचं टेन्शन वाढलंय? वापरा या टिप्स

लग्न ठरल्यावर वजन कमी करण्याचं टेन्शन वाढलंय? वापरा या टिप्स

सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अशात ज्यांचं लग्न जुळलंय त्यांना वेगवेगळ्या कामांसोबतच वाढलेलं वजन कमी करण्याचही टेन्शन आलेलं असतं. अशात जसजशी लग्नाची तारीख जवळ येते तसतशा त्यांना लवकर वजन कमी करण्याच्या टिप्स हव्या असतात. अशात त्यांना सुरुवात कशी करावी हेही कळत नाही. तुमचंही लग्न ठरलं असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. जर लग्नाला अजून एक महिलाना शिल्लाक असेल, तर या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही फार जास्त नाही. पण लग्नात फिट दिसाल इतकं वजन कमी करु शकाल.  

अनेकदा असं होतं की, मुलींना लग्नातील लूकबाबत सर्वात जास्त चिंता लागलेली असते. त्यात त्यांचं वजन जास्त असेल तर ही चिंता अधिक वाढते. प्रत्येक मुलीला हेच वाटत असतं की, लग्नाच्या दिवशी ती सर्वात सुंदर दिसावी, पण अशात लगेच वजन कमी करणं एक अव्हानच ठरतं. मात्र इतक्या कमी वेळात फार जास्त नाही. पण तुम्ही फिट दिसाल इतकं वजन काही गोष्टी तंतोतंत पाळल्या तर कमी केलं जाऊ शकतं. 

१) सर्वातआधी तर तुम्ही तुमच्या आधीच्या सवयी बदलून सकाळी लवकर उठणे सुरु करा. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि मध मिश्रित करुन सेवन करा. याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसू शकतो. 

२) वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. खासकरुन तुमचा आहार तुमच्या वजनाला अधिक प्रभावित करतो. त्यामुळे तळलेले, भाजलेले पदार्थ, ब्रेड, चिप्स, बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक सेवन करणे बंद करा. 

३) कमी वेळात वजन कमी करायचं असेल तर जेवणाचं प्रमाणा एकाएकी कमी करु नका. शरीराला दररोज १२०० कॅलरींची गरज  असते. अशात १ हजारपेक्षा कमी कॅलरी घेऊ नये. याने थकवा आणि ऊर्जेजी कमतरता जाणवणार नाही. 

४) आहारातून तेलकट-मसालेदार पदार्थ लगेच दूर करा. लो कॅलरी पदार्थांवर लक्ष केंद्रीत करा. यात उकळलेल्या भाज्यांचा अधिक फायदा होऊ शकतो. तसेच साखर नसलेला ज्यूस, ग्रीन टी, नारळाचं पाणी, लिंबाचा रस यांचं काही तासांच्या अंतराने सेवन करा. 

५) जर तुम्ही लग्नाच्या शॉपिंगसाठी जाणार असाल तर घरुन जेवण करुनच जावे. याने तुम्ही रस्त्यात भूक लागली आणि बाहेर खाल्लं तर अतिरीक्त कॅलरी घेण्यापासून वाचाल. सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने पित रहा. काही फळेही सोबत ठेवू शकता. 

६) फार जास्त हेवी एक्सरसाइज तुम्ही करु शकत नसाल तर निदान पायी चालणे, धावणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. या गोष्टी रोज फॉलो केल्याने तुमचं काही प्रमाणात वजन नक्कीच कमी होईल.

(टिप : या टिप्सच्या माध्यमातून वजन कमी होईलच असा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येकाची शरीराची रचना वेगळी असते. अशात काहींना याचा फायदा तर काहींना नाही. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)  
 

Web Title: Brides trying to loose weight before their marriage follow these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.