कोणत्याही प्रकारच्या स्कीन टाइपसाठी फायदेशीर ठरतात कडूलिंबाचे 'हे' फेस पॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:36 PM2018-09-27T15:36:26+5:302018-09-27T15:43:01+5:30

त्वचेच सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करण्यात येतो, त्यावेळी सर्वात आधी कडूलिंबाचा विचार करण्यात येतो. शरीराचे आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही कडूलिंबाचा वापर करण्यात येतो.

benefits of neem for skin face pack of neem for all skin types | कोणत्याही प्रकारच्या स्कीन टाइपसाठी फायदेशीर ठरतात कडूलिंबाचे 'हे' फेस पॅक!

कोणत्याही प्रकारच्या स्कीन टाइपसाठी फायदेशीर ठरतात कडूलिंबाचे 'हे' फेस पॅक!

googlenewsNext

त्वचेच सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करण्यात येतो, त्यावेळी सर्वात आधी कडूलिंबाचा विचार करण्यात येतो. शरीराचे आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही कडूलिंबाचा वापर करण्यात येतो. परंतु अनेक लोकांचा असा समज होतो की, कडूलिंबाचा उपयोग फक्त ऑयली स्कीनसाठी होतो. हा गैरसमज असून ड्राय स्कीनसाठीही कडूलिंब तेवढेच फायदेशीर ठरते जेवढे ते ऑयली स्कीनसाठी फायदेशीर असते. 

कडूलिंबाची पावडर, कडूलिंबाची पानं, कडूलिंबाचे तेल यांसारख्या गोष्टींनी त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करणं शक्य होतं. पिंपल्स, त्वचेला खाज येणं, अॅलर्जी, इन्फेक्शन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी कडूलिंब गुणकारी ठरते. जाणून घेऊयात कडूलिंबापासून तयार करण्यात येणाऱ्या अशा काही फेस पॅक्सबाबत जे कोणत्याही स्कीन टाइपसाठी फायदेशीर ठरतात. 

1. कडूलिंब आणि चंदन

जर तुम्हाला अनेक दिवसांपासून पिंपल्स आणि त्यांमुळे होणाऱ्या डागांचा त्रास होत असेल तर कडूलिंब आणि चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. 

तयार करण्याची क्रिया - कडूलिंबाची काही पानं पाण्यामध्ये उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर स्वच्छ भांड्यामध्ये गाळून घ्या. 

- आता 2 ते 3 चमचे चंदनाची पावडर घ्या त्यामध्ये कडूलिंबाचे गाळून घेतलेले पाणी ओतून पेस्ट तयार करा. 

- ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवून टाका. 

फायदे - 

- या फेसपॅकमुळे पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होते. 

- चेहऱ्यावर नैसर्गिक उजाळा येतो. 

- त्वचा उजळण्यासाठीही हा पॅक फायदेशीर ठरतो. 

2. कडूलिंब आणि केशर 

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी हा फेस पॅक वापरणं फायदेशीर ठरेल.

तयार करण्याची क्रिया - कडूलिंबाची ताजी पानं वाटून घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. केशर मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची पावडर या पेस्टमध्ये मिक्स करा. आता पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

 

फायदे - या फेस पॅकमध्ये असलेलं कडुलिंब चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं तर केशर रंग उजळण्यासाठी मदत करतं. चेहऱ्यावरील पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्यांपासून सुटका होईल. 

3. कडूलिंब आणि बदाम 

पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी आणि ड्राय स्कीन मुलायम बनवण्यासाठी या पॅकचा फायदा होतो. 

तयार करण्याची क्रिया - कडूलिंबाची ताजी पानं मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. त्यामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून एकत्र करा. पेस्ट जास्त घट्ट असेल तर त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटांपर्यंत ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. 

फायदे - त्वचेवर कोणतंही इन्फेक्शन झालं असेल तर या पॅकमुळे ते कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्यामुळे होणारे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन-ई असतं, जे चेहऱ्यावरील अॅक्ने दूर करण्यास मदत करतं. 

Web Title: benefits of neem for skin face pack of neem for all skin types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.