7 दिवस 7 पद्धतींनी त्वचेसाठी पपईचा असा करा वापर; मिळतील 'हे' 7 फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:39 AM2018-09-25T11:39:29+5:302018-09-25T11:46:09+5:30

आरोग्यासाठी पपईचे अनेक फायदे आहेत हे आपण सारेच जाणतो. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.

benefits of applying papaya on face for seven days | 7 दिवस 7 पद्धतींनी त्वचेसाठी पपईचा असा करा वापर; मिळतील 'हे' 7 फायदे!

7 दिवस 7 पद्धतींनी त्वचेसाठी पपईचा असा करा वापर; मिळतील 'हे' 7 फायदे!

googlenewsNext

आरोग्यासाठी पपईचे अनेक फायदे आहेत हे आपण सारेच जाणतो. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही पपई फायदेशीर ठरते. पण याव्यतिरिक्त पपईमध्ये असलेले गुणधर्म सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा वापर तुम्ही सलग 7 दिवस करू शकता. यामुळे तुम्हाला त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल. तसेच त्वचा नितळ, सुंदर आणि उजळण्यासही मदत होईल. 

पहिल्या दिवशी : चेहऱ्यावर पपईचा गर लावा

पपई घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि त्यानंतर चमच्या मदतीने व्यवस्थित स्मॅश करा. चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पपईचा गर चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा गरम पाण्याने धुवून घ्या. 

दुसऱ्या दिवशी : पपईचा ज्यूस 

पपई कापून त्याचे बारिक तुकडे करून घ्या. मिक्समधून त्यांचा ज्यूस तयार करा. हा ज्यूस कापसाच्या मदतीने चेहऱ्यवर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. 

तिसरा दिवस : पपई आणि लिंबू

पपई स्मॅश करून किंवा तिचा ज्यूस काढून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा. सुकेपर्यंत ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. 

चौथा दिवस : पपई, लिंबू, मध 

जर तुम्हाला तुमची त्वचा उजळवण्यासोबतच, त्वचा मुलायमही करायची असेल तर एका बाउलमध्ये फ्रेश पपई स्मॅश करून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

पाचवा दिवस : पुन्हा तोच पॅक लावा

4 दिवसांनंतर पुन्हा तोच पॅक लावा जेणेकरून चेहऱ्याला पूर्ण पोषण मिळू शकेल. कारण पपई, लिंबू, मधाचा पॅक फक्त त्वचा मुलायम नाही बनवत तर चेहऱ्यवरील पिम्पल्सची समस्याही दूर करतो. 

सहावा दिवस : पपई आणि मध किंवा संत्र्याच्या पावडरचा फेस पॅक

जर तुमची त्वचा ड्राय असेल तर त्यासाठी पपईमध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा त्यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होईल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पपईचा रस आणि संत्र्याची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे दोन्ही फेस पॅक चेहऱ्याच्या त्वचेला मुलायम बनवण्यास मदत करतील. 

सातव दिवस : पपई आणि हळद

हळदीमध्ये अनेक अॅन्टी-सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर त्वचेला उजाळा मिळण्यासही मदत होते. पपई आणि हळदीची पेस्ट तयार करून लावल्याने चेहऱ्याला उजाळा मिळण्यासही मदत होते. 

7 दिवसांपर्यंत पपईपासून तयार केलेले फेस पॅक लावल्याने चेहऱ्यामध्ये हे परिणाम दिसून येतील -

1. चेहऱ्यावरील पिम्पल आणि पूरळ नाहीसे होतील. 

2. चेहऱ्याला पोषक तत्व मिळतील, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम होईल आणि चेहऱ्याच्या त्वचेवर उजाळाही येईल. 

3. पपईमध्ये फ्लावनोइड नावाचा एक तत्व असतं. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि मुलायम बनते. 

4. पपईमध्ये अस्तित्वात असलेलं बीएचए (बीटा हाईड्रोक्स अॅसिड) त्वचेवरील मृत पेशींना काढून टाकण्यासाठी फायदेशीर असतं. 

5. पपईमध्ये लिंबू मिक्स करून लावल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. 

6. पपई आणि मध त्वचा मुलायम बनवते. 

7. सात दिवसांपर्यंत फक्त पपईचा रस चेहऱ्यावर लावा, त्यामुळेही त्वचा मुलायम होईल आणि त्वचेवर ग्लो येईल.

Web Title: benefits of applying papaya on face for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.