दुबई ओपनमध्ये सिंधूची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 08:24 PM2017-12-13T20:24:01+5:302017-12-13T20:58:47+5:30

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे.

Sindhu's winning opener in Dubai Open | दुबई ओपनमध्ये सिंधूची विजयी सलामी

दुबई ओपनमध्ये सिंधूची विजयी सलामी

Next

दुबई - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. सिंधूने  अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत चीनच्या ही बिंगजीयाओचे आव्हान 21-11, 16-21, 21-18 असे परतवून लावले. त्याचवेळी, पुरुष गटात मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. 
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. गुरुवारी सिंधूपुढे जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान असेल.
यंदाच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने ही बिंगजीयाओविरुद्धच्या लढतीत दमदार सुरुवात केली. तिने पहिल्याच गेममध्ये 21-11 अशा फरकाने विजय मिळवत सामन्यात आघाडी घेतली. मात्र ही आघाडी सिंधूला टिकवता आली नाही. बिंजगिआयोने दुसऱ्या गेममध्ये 21-16 अशा फरकाने विजय मिळवत लढतीत जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर तिसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. मात्र सिंधूने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावत गेम 21-18 अशा फरकाने जिंकला आणि सामन्यावर  21-11, 16-21, 21-18 अशा फरकाने कब्जा केला.  

दुसरीकडे, पुरुष गटात भारताच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनविरुद्ध सलग दोन गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीपासून व्हिक्टरच्या वेगवान खेळापुढे पिछाडिवर पडलेल्या श्रीकांतला आपल्या पहिल्याच सामन्यात 13-21, 17-21 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेमच्या तुलनेत अदुसºया गेममध्ये झुंजार खेळ करताना श्रीकांतने आशा उंचावल्या होत्या. मात्र 11-12 अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या एक्सेलसनने जबरदस्त खेळ करताना आपली आघाडी 16-13 अशी वाढवली. यानंतर त्याने श्रीकांतवर अधिक दडपण आणत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीकांतला गुरुवारी तैपईच्या चोऊ तिएन चेनविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावेच लागेल. 

Web Title: Sindhu's winning opener in Dubai Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.