सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:46 AM2017-11-25T03:46:29+5:302017-11-25T03:46:40+5:30

हाँगकाँग : स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

Sindhu stormed into the semifinals of the Hong Kong Open Super Series badminton tournament | सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

Next

हाँगकाँग : स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सिंधूने जबरदस्त खेळ करताना जपानच्या कसलेल्या अकाने यामागुची हिचा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवत दमदार आगेकूच केली.
दुसºया मानांकीत सिंधूने जपानाच्या पाचव्या मानांकीत अकानेविरुद्ध केवळ ३६ मिनिटांमध्ये २१-१२, २१-१९ असा दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा सिंधूने अखेरपर्यंत कायम राखताना अकानेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. उपांत्य फेरीत सिंधूपुढे रतचानोक इंतानोनचे तगडे आव्हान असेल. पहिल्या गेममध्ये निर्विवाद वर्चस्व राखलेल्या सिंधूला दुसºया गेममध्ये अकानेने कडवी टक्कर दिली. परंतु, सिंधूने अखेरपर्यंत वर्चस्व सोडले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu stormed into the semifinals of the Hong Kong Open Super Series badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.