प्रणयचा चोंगवर सनसनाटी विजय, डेन्मार्क सुपरसिरिज बॅडमिंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:52 AM2017-10-21T01:52:36+5:302017-10-21T01:52:44+5:30

एच. एस. प्रणय याने तीनवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन ली चोंग वेई याच्यावर सलग दुसºयांदा खळबळजनक विजयाची नोंद करीत डेन्मार्क ओपन सुपरसिरिज बॅटमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

 Pranni Chong's sensational victory, Denmark SuperSeries Badminton | प्रणयचा चोंगवर सनसनाटी विजय, डेन्मार्क सुपरसिरिज बॅडमिंटन

प्रणयचा चोंगवर सनसनाटी विजय, डेन्मार्क सुपरसिरिज बॅडमिंटन

Next

ओडेन्से : एच. एस. प्रणय याने तीनवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन ली चोंग वेई याच्यावर सलग दुस-यांदा खळबळजनक विजयाची नोंद करीत डेन्मार्क ओपन सुपरसिरिज बॅटमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांतने देखील सहज विजयाची नोंद केली.चार महिन्यांपूर्वी प्रणयने इंडोनेशिया सुपर सिरिज प्रीमियरमध्ये चोेंग वेईवर सरळ गेममध्ये मात करीत खळबळ माजवून दिली होती. आजही मलेशियाच्या या अव्वल खेळाडूला प्रणयने एक तास तीन मिनिटांत २१-१७, ११-२१, २१-१९ ने धूळ चारली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने कोरियाचा जियोन हियोक जीन याचा २१-१३, ८-२१, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. सायनाने महिला एकेरीत थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर २२-२०, २१-१३ ने सरशी साधली. पण, उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या अकाने यामगुचीविरुद्ध १०-२१, १३-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. अमेरिकन ओपन चॅम्पियन असलेला प्रणय याची लढत कोरियाचा अव्वल मानांकित सोन वान याच्याविरुद्ध होईल. इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलिया सुपर सिरिजचा विजेता असलेल्या श्रीकांतला पुढील सामन्यात सध्याचा विश्व चॅम्पियन व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन याचे आव्हान असेल. ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती सायनाला जपानची अकाने यामागुची हिचे आव्हान असेल.
इंग्लंडचा राजीव ओसफ, हाँगकाँगचा ली हून, चायनीज तायपेईचा चोऊ टिएन यांनी देखील आज उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिला एकेरीत वर्ल्ड नंबर वन ताई ज्यु यिग, कोरियाची सूंग जी हून, किम हूयोन मीन, जपानची सयाका सातो, चीनची चेन युफेई, आणि थायलंडची रतनाचोक इंतानोन यांनी अंतिम आठ खेळाडूत स्थान निश्चित केले.आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत रौप्य विजेती असलेली भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू ही मात्र चीनची चेन युफेईकडून १७-२१, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)

‘‘मी चोेंग वेईला दुसºयांदा मनवून खूश आहे. या वयातही तो सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. मागच्यावेळी चोंगला हरविले पण जेतेपद पटकावू शकलो नव्हतो. त्यामुळेच पुढचा विचार न करता केवळ पुढील सामन्याचाच विचार करीत आहे.’’ - एच. एस. प्रणय

Web Title:  Pranni Chong's sensational victory, Denmark SuperSeries Badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.