‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:04 AM2018-02-03T01:04:52+5:302018-02-03T01:50:34+5:30

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.

 Do not want foreign insurance companies for 'ModiCare'! Swadeshi Jagran Forum | ‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

googlenewsNext

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.
संस्थेचे सह-समन्वयक अश्वनी महाजन यांनी सांगितले की, ५० कोटी लोकांना आजारांवरील उपचारासाठी ५ लाखांच्या संरक्षणाची योजना सरकार सुरू करणार, ही चांगली बाब आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येऊ नये. ही संपत्ती भारतातच राहायला हवी.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्पात जगातील सर्वांत मोठी सरकारी निधीवरील आरोग्य योजना जाहीर केली होती. देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे संरक्षण मिळणार आहे.
एसजेएमने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि गरिबांचे कल्याण यावर अर्थसंकल्प केंद्रित झालेला होता, ही बाब स्वागतार्ह आहे, असे नमूद करून संघटनेने म्हटले आहे की, शेतकºयांना किफायतशीर भाव मिळायला हवा, अशी मागणी आम्ही फार पूर्वीपासून करीत आहोत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतका भाव शेतमालास मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे.
महाजन म्हणाले की, शेतकºयांना योग्य भाव देण्याची आमची मागणी सरकारने स्वीकारली ही स्वागतार्ह बाब आहे.
अर्थसंकल्पात सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाºया अनेक बाबी आहेत, त्याचेही आम्ही स्वागत करतो.

Web Title:  Do not want foreign insurance companies for 'ModiCare'! Swadeshi Jagran Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.