सीएनजीचा वापर करताना त्या कारची परिपूर्ण देखभाल करणे अत्यावश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 10:41 AM2017-12-23T10:41:11+5:302017-12-23T10:41:59+5:30

सीएनजी हे किफायतशीर इंधन आहे. मात्र, त्याचा वापर करताना त्या कारची देखभाल परिपूर्णपणे होणे गरजेचे आहे.

Use cng car with more preacations | सीएनजीचा वापर करताना त्या कारची परिपूर्ण देखभाल करणे अत्यावश्यक

सीएनजीचा वापर करताना त्या कारची परिपूर्ण देखभाल करणे अत्यावश्यक

Next

गेल्या काही काळामध्ये सीएनजी मोटारी पेटण्यासंबंदात अनेक घटना घडल्या गेल्या. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे सीएनजी, हे इंधन मुंबईमधील टॅक्सी व रिक्षांमध्ये वापरले जात आहे. मात्र जुन्या मोटारींना ज्या मूळ पेट्रोल इंधनाच्या असतात, त्यांना सीएनजी इंधनाचा टँक बसवल्यानंतर टॅक्सी सेवेत त्या रूजू करून घेतल्या जातात. सरकारी व कायदेशीर आरटीओ प्रक्रियेनंतरच सीएनजी टँक अधिकृत केला जातो. केवळ इथपर्यंत झाले म्हणजे नाही, त्या सीएनजी कारबाबत अतिशय दक्षता घेणे गरजेचे आहे. केवळ स्वस्त आहे म्हणून ते इंधन वापरले जात असले तरी त्याचा वापर करताना अनेक प्रकारची दक्षता घेणे गरजेचे असते. अलीकडेच बोरीबंदर येथे एक टॅक्सी पेटली, तशाच प्रकारच्या घटना या आधीही झालेल्या दिसतात. मुंबईबाहेरही काही रस्त्यांवर मोटारी पेटल्याची उदाहरणे आहेत. काही मोटारींमध्ये सीएनजी नसले तरीही पेटल्या होत्या. काही मोटारींमध्ये सीएनजी वा एलपीजीचा वापरही केला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रात एलपीजी अनधिकृतपणे भरला जातो, इतकेच नव्हे तर अगदी घरातील सिलींडरही त्यासाठी वापरला जातो.

मोटारींसाठी किफायतशीर इंधन म्हणून अशा प्रकारे सीएनजी व एलपीजी यांचा वापर होत आहे, अधिकृतपणे भरणा होत असला तरीही त्याचा वापर करताना तुमच्या मोटारी कशा प्रकारे देखभालीखाली ठेवल्या गेल्या पाहिजेत, आगीसारखे काही प्रसंग आल्यास काय प्रकाराने ते रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, आदी अनेक मुद्दे यानिमित्ताने उपस्थित होतात. मुळात सर्वात महत्त्वाची बाब आहे ती सीएनजीवरील मोटारींची निगा कशी राखली जाते, त्यासाठी वाहनचालक व मालक काय काळजी घेतात. त्यांना त्याचे तंत्र समजावून सांगितले गेले आहे का, की सीएनजी भरला व चालवली गाडी, इतकेच त्यांना माहिती आहे,. खरे म्हणजे सीएनजी कार वापरणा-यांना परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. त्यासाठी नवीन कंपनी फिटेड सीएनजी असो की नंतर बसवलेला सीएनजी कीट असो, ते कसे वापरावे, कोणत्या सावधानता त्या प्रकारच्या कार वापरताना घ्याव्यात, काही चुकीचे आढळले तर ते समजून कसे घ्यावे, अशा विविध प्रकारची माहिती देणारे प्रशिक्षण आज देण्याची गरज आहे.

सीएनजीची ज्वलन क्षमता समजून घ्या, त्यातून बाहेर पडणा-या इंधनाचा इंजिनाप्रत जाणारा मार्ग, त्यामध्ये असणारी प्रक्रिया, वायरींग सर्व प्रकारचे नीट आणि ताकदीचे आहे की नाही, ते सारे समजून देणे व ते नीट राखणे ही प्रत्येक सीएनजी मोटारचालकाची जबाबदारी आहे. मुंबईसारख्या वाहतूककोंडी सातत्याने होणा-या शहरामध्ये गाड्या अगदी परस्परांना खेटूनच असतात. अशावेळी सीएनजी सिलींडरने वा त्या कारने पेट घेतला तर इतर वाहनांनाही धोका होऊ शकतो. लोकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. हे लक्षात घ्यायला हवे. सीएनजीचा टँक नेमाने तपासणे, सीएनजीमुळे काडी जास्त गरम होते, ते लक्षात घेऊन इंजिन व संलग्न भागातील वायरिंग हे वितळू शकते. ते लक्षात घेऊन त्यासाठी चांगल्या दर्जाचे व प्रकारचे वायरिंग असले पाहिजे. उंदरांपासून सावधानता बाळगली पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सीएनजी असलेल्या कारमध्ये अग्निरोधक असा छोटा सिलींडर असला पाहिजेय मात्र हे सारे लक्षात न घेता कार कशाही प्रकारे वापरली जाते. अनेकदा केवळ पोटासाठी टॅक्सी चालवणा-या चालकांना सीएनजीची मोटार कशी हाताळावी, ते नीट माहितीही नसते. एखाद्याच्या गैरहजेरीमध्ये तिसराच ड्रायव्हर नेमला जातो, काहीवेळा त्याचे नाव टॅक्सी मालकालाही माहिती नसते. कारण त्याच्या ड्रायव्हरकडून तो तात्पुरता नेमला जात असतो. हे सारे तपासायला यंत्रणा नसली तरी प्रत्येक मालकाने ते पाहाणे गरजेचे आहे. सीएनजी हा किफायतशीर इंधन प्रकार आहे पण त्याचा वापर करताना मोटारीच्या इंजिनचे आयुष्य पेट्रोलच्या तुलनेत कमी असते. त्या सीएनजी इंधनाची परिपूर्ण माहिती प्रत्येक वाहनचालकाला, मालकाला असावी. त्याला त्या सीएनजी वापराबाबत नीट प्रशिक्षण दिले गेले पाहिजे व त्यानुसार मुळात देखभाल नीट झाली पाहिजे. अन्यथा थंडीच्या दिवसामध्येही सीएनजी मोटारी पेटण्याचे प्रकार घडले तर नवल वाटायला नको.
 

Web Title: Use cng car with more preacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.