ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 12:25 PM2018-08-08T12:25:59+5:302018-08-08T12:27:45+5:30

12.76 लाख रुपये किंमतीत मिळणार प्रिमियम कारसारखी वैशिष्ट्ये

solar car that will get charged on driving | ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार

ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार

Next

बर्लिन : जर्मनीमध्ये 2020 पर्यंत 10 लाख विजेवर चालणारी वाहने रस्त्यावर आणण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर म्युनिचच्या एका स्टार्टअप कंपनीने एक पाऊल पुढे टाकत सौर उर्जेवर बॅटरी चार्ज करणारी कार बनविली आहे. महत्वाचे म्हणजे ही कार चालवत असतानाही बॅटरी चार्ज होणार आहे. 
सोनो मोटर्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने नुकतीच दक्षिण जर्मनीच्या तप्त उन्हामध्ये या कारची यशस्वी चाचणी घेतली. या कारचे नाव सायन असे ठेवण्यात आले आहे. जर्मनीच्या सरकारने ठेवलेले लक्ष्य पूर्ण होणे सध्यातरी अशक्यच वाटत आहे. यामुळे सरकारने अशा कंपन्यांना प्रोत्साहन देताना विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी जी कंपनी बॅटरी साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करेल तिला सरकारकडून मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे. 
सोनो मोटर्स ही कंपनी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. ही कंपनी पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी कार बनवत आहे. या कारवर सौर पॅनल बसविण्यात आले आहे. ही कार सौर उर्जेसोबतच विजेवर किंवा दुसऱ्या विजेवर चालणाऱ्या कारद्वारे चार्ज होऊ शकणार आहे. 
या कारची निर्मिती 2019च्या मध्यावर सुरु करण्य़ात येणार आहे. जर्मनीच्या प्रकल्पाला आजपर्यंत 5 हजार ऑर्डर मिळाल्या आहेत. या कारची किंमत 12.76 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र, या कारमधील वैशिष्ट्ये एखाद्या प्रिमियम कारसारखी असणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Web Title: solar car that will get charged on driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.