maruti ertiga with new 1.5 litre diesel engine may launch soon | मारुती' अर्टिगाचा 'शक्तिशाली' अवतार; पाहा काय आहे खास!
मारुती' अर्टिगाचा 'शक्तिशाली' अवतार; पाहा काय आहे खास!

नवी दिल्ली- Maruti Suzukiच्या अर्टिगाला लवकरच नवं इंजिन जोडलं जाणार आहे. मारुती अर्टिगा 1.5-लीटर डिझेल इंजिनसह बाजारात उतरणार आहे. हे नवं इंजिन 6-स्पीड मॅन्युअल टान्समिशनचं असणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी आरटीओशी संबंधित व्यवहारात गुंतली असून, महत्त्वाचे कागदपत्रे जमा करत आहे. लवकरच नव्या डिझेल इंजिनची मारुती अर्टिगा ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. मारुतीचं हे इंजिन 1.5 लिटरसह 4 सिलिंडर डिझेल इंजिन BS-VI ऍमिशन नॉर्म्सनं युक्त असणार आहे. मारुती अर्टिगाचं इंजिन 94hpपी पॉवर आणि 225Nm पीक टॉर्क जनरेट करू शकणार आहे. मारुती अर्टिगाचं हे नवं इंजिन 1.5 लीटरचं आहे. हे इंजिन भविष्यात इतर मारुतीच्या कारमध्येही पाहायला मिळणार आहे. 

  • इंजिन

सध्या मारुती अर्टिगामध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 6,000rpmवर 105hpची पॉवर निर्माण करतो. तसेच 4,400rpmवर 138Nm टॉर्क पॉवर जनरेट करतो. याचं डिझेल इंजिन 1.3 लिटरचं आहे. जे 4,400rpmवर 90hpची पॉवर जनरेट करते. तर 1,750rpmवर 200Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशननं युक्त आहे. पेट्रोल इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचं ऑप्शन देण्यात आलं आहे. 

  • किंमत आणि मायलेज

मारुती अर्टिगाची किंमत 7.44 लाखांपासून 10.90 लाख रुपयांपर्यंत आहे. नव्या डिझेल इंजिनच्या अर्टिगाच्या मॉडलची किंमत जास्त आहे. अर्टिगाच्या पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रान्समिशनचं मायलेज 19.34 किलोमीटर प्रतिलिटर आणि पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं मायलेज 18.69 किलोमीटर प्रतिलिटर आहे. डिझेल इंजिनची अर्टिगा 25.47 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज दिलं आहे. 
 

English summary :
Maruti Suzuki Ertiga's engine will soon be upgraded. Maruti Ertiiga is going to be in the market with a 1.5-liter diesel engine. This new engine is going to be a 6-speed manual transmission.


Web Title: maruti ertiga with new 1.5 litre diesel engine may launch soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.