हुंदाइची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ कार बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:14 AM2017-08-25T01:14:26+5:302017-08-25T01:18:39+5:30

हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेड कंपनीची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. वेर्ना ब्रँडमधील ही पाचवी आवृत्ती असून, आत्तापर्यंत जगातील विविध ६६ देशांतील ८८ लाख ग्राहकांनी नेक्स्ट जेन वेर्नाच्या या आवृत्तीला पसंती दर्शवली आहे. फ्यु

Hyundai's new Global Sedan launches 'Next Gen Verna' | हुंदाइची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ कार बाजारात दाखल

हुंदाइची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ कार बाजारात दाखल

Next

मुंबई : हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेड कंपनीची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ नुकतीच बाजारात दाखल झाली आहे.
वेर्ना ब्रँडमधील ही पाचवी आवृत्ती असून, आत्तापर्यंत जगातील विविध ६६ देशांतील ८८ लाख ग्राहकांनी नेक्स्ट जेन वेर्नाच्या या आवृत्तीला पसंती दर्शवली आहे. फ्युचरिस्टीक डिझाइन, डायनॅमिक परफॉर्मन्स, सुपर सेफ्टी अ‍ॅण्डन्यू टेक्नॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स फिचर्स या चार वैशिष्ट्यांवर वेर्ना भाव खाऊन जाईल, असा विश्वास कंपनीला आहे.
हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय.के. कू म्हणाले की, या कारची डिझाइन उत्कृष्ट असून, ती तयार करताना ५० टक्के अतिरिक्त अत्याधुनिक अशा टनक स्टीलचा वापर केला आहे. शिवाय नेक्स्ट जेन वेर्ना ही स्टाइलिंग, परफॉर्मन्स, टेक्नॉलॉजी, सेफ्टी अ‍ॅण्ड राईड आणि हँडलिंगमध्ये नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल.
वेर्नाचा नवा लूक हा स्पोर्टी, अ‍ॅग्रेसिव्ह आणि मॉडर्न आहे.एलईडी डेटाइम रनिंग लाइटसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, क्रोम साऊंडसह प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, २ पीससह एलईडी टेल लॅम्प अशा विविध आकर्षणांचा समावेश या गाडीत असेल.
याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टू परफॉर्मन्स पॅक इंजिनच्या समावेशामुळे चालकाला तंत्रज्ञानाच्या शक्तीची कल्पना येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (वा.प्र.)

Web Title: Hyundai's new Global Sedan launches 'Next Gen Verna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार