Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:05 PM2022-03-29T17:05:07+5:302022-03-29T18:38:49+5:30

Hero Splendor Electric : विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे.

hero splendor electric render appears online looks promising and cool | Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज

Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) ट्रेंड सुरू झाला असून ग्राहक त्याकडे वळू लागले आहेत. खरेदीचा वेग मंदावला असेल पण तरीही त्यांचा अवलंब केला जात आहे, विशेषत: दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना कारच्या तुलनेत अधिक वेगाने पसंती दिली जात आहे.

विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे. फोटोमध्ये दिसणारी बाईक हीरो मोटोकॉर्पनेच डिझाईन केली आहे असे दिसते. अशा परिस्थितीत हिरोने येत्या काळात खरोखरच स्प्लेंडरला इलेक्ट्रिक बनवले तर वातावरण बदलेल.

लिंक्डइनवर इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडरचा फोटो शेअर करताना विनय राज सेमशेखर यांनी म्हटले की, “हीरो स्प्लेंडर ही भारतीय ग्राहकांसाठीही गरज बनली आहे. त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ती कधीही वृद्ध होत नाही. आपण त्याच्या डिझाइनमध्ये देखील कोणतीही त्रुटी शोधू शकत नाही. त्याचा प्रत्येक भाग आवश्यक आणि कार्यक्षम आहे आणि तुम्हाला या बाईकमध्ये पुरेशी जागा मिळते.”

जुन्या बाईकमधून घेतलेले बहुतेक भाग
दरम्यान, हे एक डिजिटल रेंडर आहे, ज्यामध्ये जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्प्लेंडरमधून घेतलेले बहुतेक भाग आहेत आणि इलेक्ट्रिक अवतारसाठी फक्त काही बदल केले आहेत. बाईकच्या इंजिनला काळ्या रंगाच्या बॅटरी पॅकने बदलले आहे आणि त्याच्या इंजिनशिवाय गिअरबॉक्स काढून टाकण्यात आला आहे. ती इलेक्ट्रिक दिसण्यासाठी बाईकच्या सर्व ठिकाणी निळ्या रंगाची पट्टी देण्यात आली आहे ज्यामुळे ती दिसायला खूपच आकर्षक आहे.

इलेक्ट्रिक स्प्लेंडर किती दमदार आहे?
हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या रेंडरमध्ये बाईकसोबत 9kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जे बाईकच्या मागील चाकाला पॉवर देते. तसेच या बाईकसोबत वेगळी 2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी लहान आकाराची असेल असे गृहीत धरले जाऊ शकते. स्प्लेंडरमध्ये पेट्रोल जिथून भरते, ते चार्जिंग पोर्ट या बाइकमध्ये देण्यात आले आहे. 6 kWh बॅटरीसह, बाईक 180 किमीची रेंज देते जी 4 kWh बॅटरीसह 120 किमीपर्यंत कमी होते.

Web Title: hero splendor electric render appears online looks promising and cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.