लवकरच लॉन्च होणार भारतातील पहिली CNG बाईक; जाणून घ्या किंमत अन् मायलेज...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:26 PM2024-03-11T22:26:24+5:302024-03-11T22:26:49+5:30

देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच देशातील पहिली CNG बाईक लॉन्च करत आहे.

Bajaj CNG Bike: India's First CNG Bike Launching Soon; Know the price and mileage | लवकरच लॉन्च होणार भारतातील पहिली CNG बाईक; जाणून घ्या किंमत अन् मायलेज...

लवकरच लॉन्च होणार भारतातील पहिली CNG बाईक; जाणून घ्या किंमत अन् मायलेज...

Bajaj CNG Bike: तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आणि पाहिले आहे. पण आता लवकरच भारतीय बाजारात CNG वर चालणारी बाईक येणार आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच भारतातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. हे बजाज प्लॅटिना 110 मॉडेल असेल. चाचणीदरम्यान ही बाईक अनेकदा स्पॉट झाली आहे. आता लवकरच ही बाईक प्रत्यक्षात विक्रीस उपलब्ध होईल. 

बाईक कधी लॉन्च होणार?
ही बाईक 2025 पर्यंत लॉन्च होईल, असे आधी सांगितले जात होते. पण, आता कंपनीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ही बाईक लॉन्च केली जाईल. या बाईकची किंमत सुमारे 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. दरम्यान, या बाईकचे मायलेज सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅटिनापेक्षा (75-90km/l) जास्त असेल.

कशी असेल सीएनजी बाईक 
ही सीएनजी बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅटिनासारखीच असेल. फक्त, यात इंधन टाकीऐवजी सीएनजी सिलिंडर मिळेल. असे म्हटले जात आहे की, बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी असू शकते, जी बाईकचे CNG रिकामे झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल, या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिंग लाइट्सही मिळू शकतात. बाकी इंजिनची पॉवर आणि इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील.
 

Web Title: Bajaj CNG Bike: India's First CNG Bike Launching Soon; Know the price and mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.