मारुतीनंतर आता ही मोठी कंपनी करणार डिझेल कारना 'टाटा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:43 PM2019-05-07T12:43:53+5:302019-05-07T12:46:10+5:30

कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार BS-VI उत्सर्जन मानकांमुळे डिझेलचे इंजिने महाग होणार आहेत.

After Maruti Suzuki Tata Motors also closed Diesel engine cars | मारुतीनंतर आता ही मोठी कंपनी करणार डिझेल कारना 'टाटा'

मारुतीनंतर आता ही मोठी कंपनी करणार डिझेल कारना 'टाटा'

Next

नव्या प्रदूषण नियमावलीनुसार बीएस 6 श्रेणीतील डिझेल इंजिन तयार करणे परवडणारे नसल्याने मारुतीने डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता यामध्ये आणखी एका मोठ्या भारतीय कंपनीने नंबर लावला आहे. छोट्या कारमधील डिझेल इंजिने बंद करण्याची घोषणा केल्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत. 


कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार BS-VI उत्सर्जन मानकांमुळे डिझेलचे इंजिने महाग होणार आहेत. यामुळे ग्राहक त्याकडे पाठ फिरवतील. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीने गेल्या आठवड्यात 1 एप्रिल 2020 पासून डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून ही नवी नियमावली सुरु होणार आहे. 


टाटा मोटर्सकडे एन्ट्री लेव्हल हॅचबॅक Tiago मध्ये 1 लीटरचे डिझेल इंजिन देण्यात येते. हे तीन सिलिंडर इंजिन असल्याने आवाजही खूप येतो. तसेच टिगॉरला 1.5 लीटर, बोल्ट, झेस्ट या मॉडेलनाही जुने इंजिन देण्यात आलेले आहे. या गाड्यांना जर नवे डिझेल इंजिन दिल्यास त्यांच्या किंमती 2 ते 2.5 लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते ग्राहकांना परवडणारे नाही. यामुळे 1 एप्रिल 2020 पासून टाटा मोटर्सही डिझेलच्या कार बंद करेल.


Tata Motors चे वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारेख यांनी सांगितले की, छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिझेल इंजिनच्या कारची मागणी कमी झाली आहे. यामुळे नवीन इंजिन विकसित करण्यासाठीचा खर्च मोठा असणार आहे. 
पारेख यांनी सांगितेल की, BS-VI इंजिनसोबत छोट्या डिझेल कारचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. यामुळे वाहनांची मागणी घटेल. 


डिझेल कारचे भविष्य
सध्या पेट्रोल आणि डिझेल कारचे आयुष्य १५ वर्षे निर्धारित केलेले आहे. परंतू भविष्यातील हवा प्रदुषणाचा विळखा पाहता हे आयुर्मान दहा वर्षांवर येण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत 2000 सीसी पेक्षा जास्त इंजिनाच्या कार बंद करण्यात आल्या आहेत. फरकाचे जादा मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी दहा वर्षांत प्रत्येक वर्षाला १५ ते २० हजारपेक्षा जास्त किमी कार फिरणे आवश्यक आहे. परंतू, चार-पाच वर्षांतच कार कालबाह्य होत असल्याने ती विकून नवीन घेण्याकडे कल असतो. यानुसार डिझेलची कार हौस भागवणाऱ्यांसाठी खरेच परवडणारी आहे का, हा ही विचार होणे आवश्यक ठरते. भविष्यातील इलेक्ट्रीक कार आणि सीएनजी यामुळे डिझेलची कार खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: After Maruti Suzuki Tata Motors also closed Diesel engine cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.