लाइव न्यूज़
 • 12:50 PM

  औरंगाबादः सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंद करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांचे आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले आदेश.

 • 12:44 PM

  आयसी 814 विमान अपहरण प्रकरणात दोषी ठरलेल्या अब्दुल मोमीनचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

 • 12:33 PM

  कोल्हापूर- रायगड कॉलनीतील साई दिशा सराफपेढीत चोरी. 6 लाखाचा ऐवज लंपास. गुरूवारी सकाळची घटना.

 • 12:28 PM

  मुंबई- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर. चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची घेणार भेट. विनोद तावडेही उपस्थित.विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा मागण्यासाठी भाजपाचं मतोश्रीला साकडं.

 • 12:24 PM

  बीड- खा. प्रीतम मुंडे यांचं बनावट लेटरपॅड वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली तीन एकर जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार.

 • 12:17 PM

  औरंगाबादः औषध खरेदी प्रकरणात पूर्ण नोंदी सादर करण्याचे पालकमंत्री रामदार कदम यांचे आदेश.

 • 11:41 AM

  उस्मानाबाद : कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा. उस्मानाबाद शहराजवळ येताच राष्ट्रवादीच्या आंदोलकांकडून चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे प्रयत्न.

 • 11:23 AM

  मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदची आज होणार नजर कैदेतून सुटका.

 • 11:15 AM

  सोलापूर- विरोधकांकडून खड्ड्यांचा बाऊ केला गेला. पावसाळ्यात खड्डे पडतात आणि बुजविले जातात हे नेहमीचं काम. विरोधकांची खड्ड्यांवरून स्टंटबाजी. चंद्रकांत पाटील यांचा टोला.

 • 11:13 AM

  मुंबई - मुंबई पोर्ट ट्रस्टकडून रे रोड येथे दुचाकीस्वारांकडून आकारण्यात येणाऱ्या टोलविरोधात शिवसेनेचं आंदोलन सुरू. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पोर्ट ट्रस्टचे चेअरमन यांच्याकडे टोलमुक्तीची केली मागणी. आश्वासन न पाळल्याने आंदोलन.

 • 11:09 AM

  मुंबई- शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. आज रात्री साडेआठ वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार भेट. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसंदर्भात बैठक असल्याची सुत्रांची माहिती.

 • 10:31 AM

  तळेगाव येथील अपघातात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू. उप संचालकासह दोन जण जखमी.

 • 10:23 AM

  पद्मावती 1 डिसेंबरला यूकेमध्ये होणार प्रदर्शित, ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनचा पद्मावती चित्रपटाला हिरवा कंदिल.

 • 10:23 AM

  जळगाव- शहरात आज मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीमेचा शुभारंभ .डॉक्टर तात्याराव लहाने यांची उपस्थिती.

 • 09:10 AM

  डोंबिवली-विठलवाडी स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.

All post in लाइव न्यूज़