यंदा तूर डाळ सामान्यांच्या आवाक्यात

By Admin | Published: December 25, 2016 11:53 PM2016-12-25T23:53:24+5:302016-12-25T23:55:56+5:30

ज्ाालना : गतवर्षी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातून हद्दपार झालेली तूर डाळ यंदा आवाक्यात येण्याची चिन्हे आहेत.

This year, the availability of tur dal is available | यंदा तूर डाळ सामान्यांच्या आवाक्यात

यंदा तूर डाळ सामान्यांच्या आवाक्यात

googlenewsNext

ज्ाालना : गतवर्षी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातून हद्दपार झालेली तूर डाळ यंदा आवाक्यात येण्याची चिन्हे आहेत. यंदा तुरीच्या डाळीचे भाव गेल्यावर्षी पेक्षा अर्ध्यावरच आले आहेत.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तुरीचे पीक जोमात आले आहे. काही शेतकऱ्यांना तुरीचे खळे करून बाजारात तूर विक्रीसाठी आणली आहे. आठ दिवसांपासून तुरीची आवक सुरू झाली आहे. ५ हजार ते साडेपाच हजार प्रति क्विंटला भाव मिळत आहे. आत्तापर्यंत सुमारे एक हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. शनिवारी पांढरी तूर ६२८ क्विंटल तर लाल २७ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. पांढऱ्या तुरीचा भाव कमाल भाव ५५८६ तर किमान ४२८६ भाव मिळाला. तर सरासरी भाव ५ हजार एवढा आहे. त्यामुळे यंदा तुरीचे भाव पाच ते सहा हजारांच्या आसपास राहण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी भाव १२ हजार रूपये प्रति क्विंटलपर्यंत केले होते. समाधानकारक पावसामुळे तुरीचे क्षेत्र वीस हजार हेक्टर एवढ होते. उत्पादनही चांगले आहे. आवक चांगली होत असल्याने भाव आटोक्यात अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: This year, the availability of tur dal is available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.