अवैध दारू विक्रीला आळा घाला; शार्दूलवाडी येथील महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:05 PM2019-02-18T14:05:14+5:302019-02-18T14:06:23+5:30

गाव परिसरात अवैध दारू निर्मिती आणि विक्री सुरु आहे

Stop the sale and sale of illegal liquor; At Shardulwadi women police station was beaten | अवैध दारू विक्रीला आळा घाला; शार्दूलवाडी येथील महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या

अवैध दारू विक्रीला आळा घाला; शार्दूलवाडी येथील महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) : वेरूळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शार्दूलवाडी येथे गावठी दारू निर्मिती आणि विक्री सुरु आहे. यामुळे काही ग्रामस्थ व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबात आणि गावात अशांतता आहे. या अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर आळा घालावा या मागणीसाठी येथील महिलांनी आज खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ ग्रूप  ग्रामपंचायत अंतर्गत शार्दूलवाडी गाव आहे. येथील माटेगाव धरण क्षेत्रात काहीजण अवैधरीत्या (गावठी) हातभट्टीची दारूची निर्मिती करत आहेत. काही ग्रामस्थ या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे कुटुंबामध्ये अशांतता पसरली आहे. या ठिकाणची दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालावा या मागणीसाठी आज येथील महिलांनी खुलताबाद पोलीस ठाण्यावर धडक मारून तक्रार दिली.

Web Title: Stop the sale and sale of illegal liquor; At Shardulwadi women police station was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.