राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद, लातूर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:15 AM2019-01-19T01:15:38+5:302019-01-19T01:15:48+5:30

कन्नड येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबादने फॉईल प्रकारात, तर लातूरने सायबर प्रकारात विजयी सुरुवात केली आहे. या स्पर्धेत २७ जिल्ह्यांतील ३७३ खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

State level shootout competition Aurangabad, Latur won | राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद, लातूर विजयी

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद, लातूर विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : कन्नड येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबादने फॉईल प्रकारात, तर लातूरने सायबर प्रकारात विजयी सुरुवात केली आहे. या स्पर्धेत २७ जिल्ह्यांतील ३७३ खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटातील फॉईल प्रकारात औरंगाबादने जळगावचा १५-४, अमरावतीने लातूरचा १५-७, मुंबईने नाशिकचा १५-९, बुलडाणाने भंडारा संघाचा १५-९ असा पराभव केला. मुलींच्या गटातील सायबर प्रकारातही यजमान औरंगाबाने विजयी प्रारंभ करताना नाशिकचा १५-११, लातूरने नंदुरबारचा १५-३, सांगलीने मुंबईचा १५-७, पालघरने नागपूरचा १५-९ असा पराभव करीत विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, वसंतराव देशमुख, अभय देशमुख, सुनील देशमुख, अंजूम भोसले, प्रमोद देशमुख, अशोकराव आहेर, प्राचार्य विजय भोसले, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, शेषनारायण लोंढे, राजकुमार सोमवंशी, दिनेश वंजारे, भूषण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून केदार ढवळे, विनय जाधव, दीपक शिवसागर, प्रफुल्ल धुमाळ, राजू शिंदे, राहुल पडूळ, पांडुरंग गुरव, विजय गाडेकर, अक्षय गोलांडे, आनंद वाघमारे आदी काम पाहत आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवीण शिंदे, रामचंद्र इडे, कारभारी भानुसे, राहुल दणके, अमृता भाटी, ही. के. देशमुख, सुनील गोर्डे, प्रकाश महाजन, मीना वडगुळे, अलका गडकरी, स्वप्नील तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: State level shootout competition Aurangabad, Latur won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.