शिवसेनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:35 AM2017-08-24T00:35:21+5:302017-08-24T00:35:21+5:30

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी करुन शेतकºयांना त्वरित बेबाकी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी लीड बँकेसमोर निदर्शने करण्यात आली.

 Shivsena's Dare movement | शिवसेनेचे धरणे आंदोलन

शिवसेनेचे धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी करुन शेतकºयांना त्वरित बेबाकी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी लीड बँकेसमोर निदर्शने करण्यात आली.
राज्यात कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. पात्र शेतकºयांची यादी अजून कोणत्याही बँकेत लावली नाही. कर्जमाफी योजना विविध नियम व अटींच्या कचाट्यात अडकली आहे, याचा शेतकºयांना फटका बसला आहे. जिल्ह्यात शेतकºयांना पीक विमा भरुन घेण्यासाठी आणि आता कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. जिल्ह्यात ८३३ केंद्रे उभारण्यात आली आहेत. शासनाच्या कर्जमाफी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकºयांना बेबाकी प्रमाणपत्र द्यावे, बँकांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी लावावी इ. मागण्या करण्यात आल्या.
यावेळी धोंडू पाटील, डॉ. मनोजराज भंडारी, बाबूराव कदम, भुजंग पाटील, प्रमोद खेडकर, रवींद्र भिलवंडे, साहेबराव शिंदे, गौतम जैन, सरदार नवज्योतसिंघ गाडीवाले, पप्पू जाधव, जयवंत कदम, दत्ता कोकाटे, वैजनाथ देशमुख, निकिता शहापूरवाड, दीपाली उदावंत, शैलेशसिंह रावत, माणिक लोमटे, संतोष कल्याणकर, बाबाराव रोकडे, सुनील रामदासी उपस्थित होते.

Web Title:  Shivsena's Dare movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.