औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा कर्मचारी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:33 PM2018-06-13T13:33:05+5:302018-06-13T13:35:32+5:30

दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Security personnels in Aurangabad Airport will increased | औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा कर्मचारी वाढणार

औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा कर्मचारी वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्दे देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश आहे.

औरंगाबाद : दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश आहे.

विमानतळावर गत काही वर्षांत प्रवासी संख्येत वाढ झाल्याने घातपात वा दहशतवादी हल्ल्यांच्या संभाव्य कारणामुळे सुरक्षा व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी विमानतळावर हायजॅकिंगचे ‘मॉकड्रील’ करण्यात आले होते. यामध्ये सुरक्षा दलाच्या यंत्रणा यशस्वी ठरल्या.  या सुरक्षा यंत्रणेमुळे व कर्मचाऱ्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासह प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसण्यासाठी मदत होणार आहे.

महिनाभरात कर्मचारी रुजू
औरंगाबाद विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याची माहिती आपल्याकडे आहे. अद्याप हे कर्मचारी रुजू झाले नाहीत. महिनाभरात ते रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.
- डी.जी. साळवे, संचालक, भारतीय विमान प्राधिकरण, विमानतळ, औरंगाबाद.

Web Title: Security personnels in Aurangabad Airport will increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.