बीड, लातूरमध्ये सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत घोटाळा- संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 03:45 PM2018-04-21T15:45:10+5:302018-04-21T15:45:22+5:30

बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

Scam in Public Food Distribution System in Beed, Latur - Sambhaji Brigade | बीड, लातूरमध्ये सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत घोटाळा- संभाजी ब्रिगेड

बीड, लातूरमध्ये सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत घोटाळा- संभाजी ब्रिगेड

औरंगाबाद- बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रेशनची धान्य वाहतूक करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने प्रशासनाला दिलेल्या चारचाकी वाहनांच्या यादीत काही दुचाकींचे नंबर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे दोन्ही जिल्ह्याचा एकच ठेकेदार असून ठेकेदाराने  बीड आणि लातुर जिल्ह्या प्रशासनाला एक समान वाहनांची यादी दिल्याने एक वाहने दोन जिल्ह्यात कशी अन्न-धान्याची वाहतुक कशी करू शकतात,असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला.
याविषयी डॉ. भानुसे म्हणाले की, आम्ही राज्यभरातील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा निर्णय घेतला. यांतर्गत राज्यातील सर्वच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधात माहिती कायद्यांतर्गत माहिती मागविली आहे. बीड आणि लातुर जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या दोन्ही जिल्ह्यातील रेशनच्या धान्याचा वाहतूक करणारा एकच ठेकेदार असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा ठेका घेताना ठेकेदाराने प्रशासनाला सादर केलेल्या त्याच्याकडील चारचाकी मालवाहु वाहनांशी शहानिशा न करता त्यास कंत्राट देण्यात आले. त्याने दिलेल्या वाहनांच्या यादीतील  एमएच-१६ एएस ८६७४, एमएच-१६ एएस ७२६४ या क्रमांकाच्या दुचाकी असल्याचे समोर आले. शिवाय दोन्ही जिल्ह्यात एकाचवेळी एमएच-२९एम ३५५५, एमएच-२३-७१३७, एमएच-१२डीटी ९४८१, एमएच१२एचडी २९५७, एमएच-२६एडी ०६०२, एमएच-३८डी ९३३३, एमएच-१३एक्स २४६८ ही वाहने कार्यरत असल्याचे दिसतात. हे सर्व संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांच्या संगनमताने सुरू असल्याचे त्यांनी सांगतले. बीड आणि लातुर जिल्ह्यातील ६०टक्के लोक उसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतरीत झालेले आहेत, असे असताना त्यांच्या नावे येणारे धान्य परस्पर ठेकेदार व अधिकारी संगनमताने काळ्याबाजारात विक्री करीत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी  जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे,अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांना दिल्याचे डॉ.भानुसे यांनी सांगितले.  यापत्रकार परिषदेलारमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, राजेंद्र पाटील, मोहिनी भानुसे आदी उपस्थित होते.

Web Title: Scam in Public Food Distribution System in Beed, Latur - Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.