पिठात विष कालवणा-या राजू राठोडला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:26 AM2017-11-24T00:26:07+5:302017-11-24T00:26:18+5:30

तालुक्यातील न्हावी तांडा येथे स्वत:च्या घरात ज्वारीच्या पिठात विष कालवून आपले संपूर्ण कुटुंब संपविणाचा प्रयत्न करणाºया राजू राठोड याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशीरा सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Raju Rathod arrested in toxic acid | पिठात विष कालवणा-या राजू राठोडला अटक

पिठात विष कालवणा-या राजू राठोडला अटक

googlenewsNext

सोयगाव : तालुक्यातील न्हावी तांडा येथे स्वत:च्या घरात ज्वारीच्या पिठात विष कालवून आपले संपूर्ण कुटुंब संपविणाचा प्रयत्न करणाºया राजू राठोड याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशीरा सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री राजूने पिठात विष कालविल्यामुळे त्याच्या दोन मुली व एक मुलगा विषबाधेने मरण पावले. त्याची पत्नी कावेरीबाई यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. गुरुवारी सोयगावचे सपोनि. सुजित बडे यांनी जळगाव येथे जाऊन कावेरीबाईचा जवाब घेतला. घरगुती भांडण, नेहमी शिवीगाळ करून राजू संपूर्ण कुटुंबाला एखाद्या दिवशी संपवून टाकीन, अशी धमकी देत होता, अशा आशयाची तक्रार कावेरीबाईने दिल्यावरून सोयगाव पोलिसांनी कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६ व २०१ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Raju Rathod arrested in toxic acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.