पदव्युत्तरच्या मुदतपूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:00 AM2018-03-18T00:00:19+5:302018-03-18T00:00:32+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळी दोन महिने उशीर केल्याचा वेळ भरून काढण्यासाठी चक्क दोन महिन्यांच्या शिकवणीनंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ९० दिवस तासिका न होताच २६ मार्चपासून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले.

Postgraduate Pre-Examination | पदव्युत्तरच्या मुदतपूर्व परीक्षा

पदव्युत्तरच्या मुदतपूर्व परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवेश गोंधळाचा परिणाम : परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळी दोन महिने उशीर केल्याचा वेळ भरून काढण्यासाठी चक्क दोन महिन्यांच्या शिकवणीनंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ९० दिवस तासिका न होताच २६ मार्चपासून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले.
विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी घेतलेल्या सीईटीमुळे प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला होता. या प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिने उशीर झाल्यामुळे १ सप्टेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात झाली. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा डिसेंबरअखेर घ्याव्या लागल्या. तत्पूर्वी परीक्षा विभागाने तृतीय सत्रांच्या परीक्षा घेतल्या होत्या; मात्र द्वितीय सत्राला १ जानेवारीपासून सुरुवात झाली. यामुळे तेव्हापासून ९० दिवसांची शिकवणी पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट होते. मे महिन्यात पदव्युत्तरच्या परीक्षा घेतल्यास त्याचा परिणाम आगामी शैक्षणिक वर्षावर होणार असल्यामुळे परीक्षा विभागाने या परीक्षा मार्च महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २६ मार्चपासून पदव्युत्तरच्या परीक्षा सुरू होणार आहेत; मात्र या परीक्षेत ९० दिवसांच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप करीत परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिले आहे. या निवेदनावर भाग्यश्री धापसे, मंदाकिनी मोकळे, कोमल मोकळे, मीनाक्षी वसापे, शेख हिना शेख सिकंदर, प्रांजली गवई, ज्योती कीर्तिशाही, प्रियंका मोरे, विद्यार्थी दाभाडे, सुनीता आठवले, शरद निकाळजे, ज्योती पगारे, प्रियंका पवार, सुनीता कांबळे, पल्लवी पाटील आदींसह ६० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लघु शोधप्रबंध सादर करण्यास वेळ द्या
विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एम.एस. डब्ल्यू, एमबीए, एमएडसारख्या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक असते. यात लघुशोध प्रबंध, क्षेत्रकार्य आदींचा समावेश आहे. हे काम करण्यास पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. यामुळे मुदतीपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

Web Title: Postgraduate Pre-Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.