क्षेत्र नसलेल्यांनीही बोंडअळीचे अनुदान लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:36 AM2019-01-19T00:36:00+5:302019-01-19T00:36:24+5:30

फुलंब्री तालुका : याद्या बनविताना घोळ; शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय

 The people of the area also resorted to bottleneck grant | क्षेत्र नसलेल्यांनीही बोंडअळीचे अनुदान लाटले

क्षेत्र नसलेल्यांनीही बोंडअळीचे अनुदान लाटले

googlenewsNext

रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान देताना काही शेतकºयांना क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार घडला असून यामुळे खºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुटपुंजा लाभ मिळालेल्या शेतकºयांनी केली आहे.
फुलंब्री तालुक्यात २०१७ मध्ये शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीत प्रथम प्राधान्य कपाशी पिकाला दिले होते. सुमारे ३५ हजार शेतकºयांनी २६ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली. पण अचानक बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने निम्मी बोंडे खराब झाली. परिणामी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला. बोंडअळी नुकसानीबाबत भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांनी ओरड केली. यानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली. यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश होता.
२१ कोटी २७ लाख रुपये मिळाले
तालुक्यात ६१ हजार शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानापोटी शासनाकडून २१ कोटी २७ लाख रुपये मिळाले होते. हे अनुदान वाटप करताना तलाठीस्तरावर घोळ करण्यात आला. यामुळे खºया शेतकºयांना तुटपुंजे अनुदान मिळाले तर क्षेत्र नसलेल्यांना फुकटचे अनुदान मिळाले.
केवळ २५ टक्केच मिळाले अनुदान
शासनाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाला अनुदान देताना हात आखडता घेतला. जे नुकसान झाले त्याच्या केवळ २५ टक्केच रक्कम अनुदानापोटी शेतकºयांना देण्यात आली. एका हेक्टरसाठी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले. पण शेतकºयांना एका हेक्टरसाठी लागणारा खर्च सुमारे २८ ते ३० हजार रुपये येतो. असे असताना शासनाने केवळ द्यायचे म्हणून २५ टक्केच अनुदान दिल्याने शेतकºयांत नाराजी पसरली आहे.
याद्या तयार करताना दलालाकडून चलाखी
याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. तलाठी सजांमध्ये असलेल्या दलालांनी याचा फायदा घेत आपल्या जवळच्या लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने यादीत टाकली. ज्या शेतकºयांकडे कपाशीचे क्षेत्र जास्तीचे आहे, त्यांचे क्षेत्र कमी दाखविण्यात आले तर ज्या शेतकºयाच्या नावे कमी क्षेत्र आहे, त्या शेतकºयांचे क्षेत्र वाढवून दाखविले व अनुदान लाटण्यात आले. अनुदान वाटप करताना याद्या कोणी बनविल्या, याची चौकशी करुन झालेल्या घोळाला जबाबदार असणाºया लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  The people of the area also resorted to bottleneck grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.