जुन्या शहरातील नगरसेवक अलिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:25 AM2018-03-19T01:25:41+5:302018-03-19T01:25:44+5:30

जुन्या शहरात कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. दररोज नागरिक कच-याला आग लावत असल्याने नागरिकांचा दम कोंडतोय. त्यातच नगरसेवक कचरा कोंडीपासून अलिप्त धोरण स्वीकारत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

The old city corporator detained | जुन्या शहरातील नगरसेवक अलिप्त

जुन्या शहरातील नगरसेवक अलिप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडी आणखी काही दिवस फुटण्याची शक्यता नाही. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात तरी कचरा प्रश्नात दिलासा मिळेल का? याकडे संपूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे. जुन्या शहरात कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. दररोज नागरिक कच-याला आग लावत असल्याने नागरिकांचा दम कोंडतोय. त्यातच नगरसेवक कचरा कोंडीपासून अलिप्त धोरण स्वीकारत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.
सिडको-हडकोसह चिकलठाणा, रामनगर, मुकुंदवाडी, जयभवानीनगर आदी अनेक वॉर्डांमध्ये कच-याची समस्या अजिबात नाही. दररोज जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतोय. ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येत आहे. कचरा कोंडीची झळ सर्वाधिक महापालिकेच्या झोन १, २ आणि ३ मध्ये बसली आहे. या तिन्ही झोनमधील सुमारे ४० पेक्षा अधिक वॉर्ड जुन्या शहरातील आहेत. या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचरा कोंडी फोडण्यासाठी मनपा जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, महापालिकेच्या यंत्रणेला अजिबात यश मिळत नाही. नगरसेवकही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार नाहीत. बोटावर मोजण्याएवढ्याच नगरसेवकांनी सकाळी ६ ते १० मनपाच्या सफाई कामगारांसोबत जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. स्वत: हातात माईक घेऊन नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नगरसेवक करीत आहेत. काही नगरसेवक कचरा प्रश्न शंभर टक्केप्रशासनाशी निगडित आहे, असे समजून हात झटकत आहेत. नगरसेवकाच्या रेट्यानंतरच कच-याचे वर्गीकरण होऊ शकते, असे घनकचरा विभागात काम करणा-या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
वॉर्डनिहाय जनजागृती मोहीम मनपाने सुरू केली आहे. या मोहिमेकडे नगरसेवकच पाठ फिरवत असल्याने त्या निरर्थक ठरत आहेत.

Web Title: The old city corporator detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.