छावणीत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या नऊशेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:18 AM2017-11-13T00:18:16+5:302017-11-13T00:18:19+5:30

छावणी परिसराला गॅस्ट्रोने अक्षरश: विळखा घातला असून, दुस-या दिवशी रविवारी (दि.१२) देखील छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचा ओघ दिवसभर सुरूच होता.

 Number of Gastro patients goes to nine hundred | छावणीत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या नऊशेवर

छावणीत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या नऊशेवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी परिसराला गॅस्ट्रोने अक्षरश: विळखा घातला असून, दुस-या दिवशी रविवारी (दि.१२) देखील छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचा ओघ दिवसभर सुरूच होता. रुग्णांचा आकडा तब्बल ९३८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. रुग्णांच्या संख्येमुळे लष्कर, घाटी रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मनपाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रुग्णांची संख्या अधिक असली तरी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले.
उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने छावणी परिसरातील शेकडो रहिवाशांनी एकाच वेळी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतल्याने शनिवारी खळबळ उडाली. अचानकपणे रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली. गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करीत रुग्णांना उपचारासाठी रांगेत ताटकळावे लागले. दिवसभरात २५० वर रुग्णांवर उपचार करण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत सुरू असलेला रुग्णांचा हा ओघ दुस-या दिवशीही कायम होता. रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली. रुग्णांची गर्दी वाढतच राहिल्याने लष्कर, घाटी रुग्णालय आणि महापालिकेच्या पथकला पाचारण क रण्यात आले. रुग्णांच्या संख्येमुळे शनिवारी अनेकांना मिळेल त्या जागेवर उपचार घ्यावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही व्यक्तींनी पुढाकार घेऊन रुग्णालयाच्या परिसरात मंडप आणि खाटा उपलब्ध करून दिल्या.
रुग्णांबरोबर नातेवाईकांची रुग्णालयात एकच गर्दी झाली. उपचारासाठी एकमेकांना मदत करण्यात येत होती. त्याच वेळी उद््भवलेल्या परिस्थितीला छावणी परिषद जबाबदार असल्याचे म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता.

Web Title:  Number of Gastro patients goes to nine hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.