सरपंचावर अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:47 PM2017-08-16T23:47:14+5:302017-08-16T23:47:14+5:30

वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला

No confidence motion on Sarpanch | सरपंचावर अविश्वास ठराव

सरपंचावर अविश्वास ठराव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला. दोन वर्षापूर्वी सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
दोन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच १७ पैकी १४ सदस्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला. १९ आॅगस्ट रोजी हट्टा ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अविश्वास ठरावावर उपसरपंच सोमनाथ शेळके, ग्रा.पं.सदस्या लीलाबाई देशमुख, लताबाई देशमुख, संघमित्रा दिपके, सुरेखा जाधव, पार्वतीबाई पवार, ताहेराबी शेख, गजानन वानेरे, प्रल्हाद शिंदे, शेख खालेद, शेख अकबर, समद कुरेशी, रतन ढगे, रतन खाडे यांच्या अविश्वास ठरारावर सह्या आहेत. १९ आॅगस्ट रोजी विशेष सभेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर १४ सदस्यांनी अचानक अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे खळबळ उडाली असून, हट्टा सरपंचाने दोन वर्षांच्या काळात विकास कामे केली नसल्याची चर्चा ग्रामपंचायत सदस्य करीत आहे. तसेच दोन वर्षापूर्वी ‘सच का साथ’ घेऊन ही विकास झाला नाही. दोन वर्षाच्या काळात गावातील विकास कामे झाली नाही. ऐन दुष्काळी परिस्थितीत लाखों रुपये पाण्याच्या योजनेसाठी खर्च झाला; परंतु अखेर टँकरनेच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मागील काही वर्षांपासून हट्टा ग्रा.पं.ला अनेक ग्रामविकास अधिकारी लाभले. त्यांनी ‘सच का साथ अपना विकास’ करण्याची चर्चा ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ करीत आहेत. १९ आॅगस्ट रोजी अविश्वास ठरावाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, सदस्यांनी सध्या तरी मौन पाळलेले दिसून येत आहेत. शिवाय याबाबत गावामध्ये एकच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे.

Web Title: No confidence motion on Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.